वाशिम जिल्ह्यातील शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांपासून सफाई कामगारांपर्यंतची विविध पदे रिक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:41 PM2017-11-04T14:41:21+5:302017-11-04T14:43:07+5:30
वाशिम: जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, असे १८५ शासकीय रुग्णालये कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे.
वाशिम: जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, असे १८५ शासकीय रुग्णालये कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र, विविध स्वरूपातील तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर आवश्यक कर्मचाºयांची २५० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने आरोग्य सुविधांचा पुरता बट्ट्याबोळ उडत असल्याचे दिसून येत आहे.
अकोला जिल्ह्यापासून विभक्त होवून १ जुलै १९९८ रोजी नव्याने वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. असे असताना गेल्या १७ वर्षाच्या काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अद्याप सक्षम झालेली नाही. जिल्ह्यात सद्या १ जिल्हा सामान्य रुग्णालय, ७ ग्रामीण रुग्णालय आणि १५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अशी १८५ रुग्णालये कार्यान्वित आहेत; परंतू कर्मचाºयांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर झाल्याने त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर जाणवत आहे.
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग १ ची १६ पदे मंजुर आहेत; मात्र त्यापैकी फक्त ३ पदे भरलेली असून उर्वरीत १३ पदे रिक्त आहेत. यासह वर्ग २ ची १६ पदे मंजूर असून फक्त ८ अधिकारी कार्यरत असून निम्मी म्हणजेच ८ पदे रिक्त आहेत. जिल्हयात ७ ग्रामीण रुग्णालय आहेत. त्यापैकी केवळ ग्रामीण रुग्णालय, कारंजा येथील वैद्यकीय अधिक्षक वर्ग १ चे पद भरलेले आहे. उर्वरीत सहा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक वर्ग १ हे पद रिक्त असल्याची माहिती आहे. वैद्यकीय अधिकाºयांचीही बिकट परिस्थिती असून बहुतांश ठिकाणी ही पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य सुविधांचा पुरता फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.