जलसंधारण विभागाच्या सचिवांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या विविध समस्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:26 PM2018-09-08T14:26:37+5:302018-09-08T14:28:02+5:30
तकरी उत्पादक कंपनीच्या शेतकºयांनी कृषीविषयक विविध समस्या मांडून डवले यांचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले ८ सप्टेंबर रोजी वाशिम येथे एका बैठकीनिमित्त आले असता, शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकºयांनी कृषीविषयक विविध समस्या मांडून डवले यांचे लक्ष वेधले.
शेतकरी समुहाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याची संकल्पना राज्य सरकारने प्रत्यक्षात साकारली आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळपास २५ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. या कंपन्यांना भेडसावणाºया समस्या शेतकºयांनी जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासमोर मांडल्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत महाबीज, कृभको, कृषी विज्ञान केंद्राला बिजोत्पादन व वितरणासाठी अनुदान दिले जाते, या तत्वाप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनीलादेखील अनुदान देण्यात यावे, सीड हबसाठी खासगी उद्योगांप्रमाणेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान द्यावे, गत दहा वर्षाच्या कालावधीत ज्या वाणांच्या बियाण्याला जास्त मागणी होती, अशा प्रमाणित, पायाभूत बियाण्याला बियाणे उत्पादन अनुदान मिळावे, पेरणी तंत्रज्ञानाला शासकीय स्तरावरून प्रोत्साहन देण्यात यावे, राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच वित्त पुरवठा करणाºया सहकारी संस्थांद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांना कर्जपुरवठा करण्यात यावा, जिल्हास्तरावर शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संघ स्थापन झाले असून, त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी ‘कृषी मॉल’ उभे करण्यासाठी अर्थसहाय्य, मदत करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीच्या पदाधिकाºयांनी एकनाथ डवले यांच्याकडे केल्या. यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे पंजाबराव अवचार, विलास गायकवाड, गजानन अवचार, दिलीप फुके, शिवाजी भारती, राजू इंगळे, ज्ञानेश्वर ढेकळे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती.