आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:32 PM2017-10-04T13:32:29+5:302017-10-04T13:32:42+5:30

Various programs in the District for Disaster Management Week | आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

Next


वाशिम : संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर दरवर्षी १३ आॅक्टोंबर हा दिवस आपत्ती निवारण दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांना हा दिवस राज्यांमध्ये निरनिराळे आपत्ती निवारण विषयक उपक्रम घेऊन व रंगीत तालीम राबवून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये १३ आॅक्टोंबर  रोजी संबंधित जिल्हा प्रवण असलेल्या आपत्ती विषयी रंगीत तालीमराबविण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुशंगाने जिल्हा तरावर ९ आॅक्टोंबर  रोजी सकाळी ११ ते १ वा. या कालावधीमध्ये नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीमध्ये माझे योगदान या विषयावर २५० शब्द मयार्देत निबंध स्पर्धा व दुपारी ३ ते ५ या कालावधीमध्ये नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती व त्याचे परिणाम या विषयावर चित्रकला स्पर्धा मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे आयोजीत करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धाकरीता वर्ग ७ वी ते ११ वी चे विद्यार्थी बसु शकतील. याकरीता आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत .  १३ आॅक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. १० आॅक्टोंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालय-अकोला नाका-पाटणी चौक-शिवाजी चौक-नगर परिषद चौक-आंबेडकर चौक-बस स्टँड-जिल्हाधिकारी कार्यालय (विसर्जन) या मागार्ने काढण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी २ ते ४ या कालावधीत सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.११ आॅक्टोंबर रोजी रात्री ८ ते १०  मौजे साखरा ता. वाशिम येथे ग्रामपातळीवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ आॅक्टोंबर रोजी जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर,मानोरा, कारंजा तालुक्यातील २८ शाळेमध्ये शाळेशी संबधीत विविध आपत्तीला अनुसरुन मॉक ड्रील (रंगीत तालीम) चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १३ आॅक्टोंबर रोजी दुपारी वाकाटक सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे समारोपीय तथा बक्षिस वितरणकार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होईल. सदर कार्यक्रमामध्ये स्पधेर्तील विजेत्यांना बक्षिस व प्रमाणपत्र वितरण, जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक सदस्यांना प्रमाणपत्र वितरण, रॅलीमध्ये सहभागी शाळांना प्रमाणपत्र वितरण तसेच परिक्षक व पर्यवेक्षक यांना प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे, बालासाहेब बोराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन धिकारी, यांनी कळविले .

Web Title: Various programs in the District for Disaster Management Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.