सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:36+5:302021-01-08T06:09:36+5:30
रिठद येथे जयंती साजरी रिठद : स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात ...
रिठद येथे जयंती साजरी
रिठद : स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
तिवळी येथे जयंती कार्यक्रम
मालेगाव : तालुक्यातील तिवळी येथील श्री विठ्ठल महाराज विद्यालय व श्री सीताराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष गिऱ्हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विभागीय शिक्षक संघाचे मालेगाव तालुका अध्यक्ष गजानन भिसडे, विष्णू लादे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीक्षा खंदारे आणि मयुरी लहाने या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. धीरज जाधव आणि अभिषेक लहाने यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. पल्लवी लहाने हिने संचालन तर एकनाथ कांबळे याने आभार मानले.
केनवड येथे जयंती साजरी
केनवड : येथील गोळे कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
वाशिम येथे जयंती साजरी
वाशिम - येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास गोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष केशव खासबागे, संचालक नारायण सरनाईक, वा.का.महल्ले, केशव वाबळे, नागेश कव्हर, नितीन काळे, अरुण जाधव, सुरेश नरवाडे, व्यवस्थापक शंकर घुले, शिक्षक सभासद राजाभाऊ खोटे, केशव अंजनकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
चिखली येथे जयंती कार्यक्रम
रिसोड : तालुक्यातील चिखली येथे श्री संत सावता माळी युवक संघ व गावकरी यांच्यातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तथा महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक, श्री संत सावता माळी युवक संघाचे विदर्भ विभागीय संघटक राजू नेहुल, विलास खोरणे, डॉ. अशोक लाड, संतोष लाड, रामराव अंभोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. संचालन राजू नेहुल तर आभार घनश्याम लाड यांनी मानले. यावेळी भाग्यश्री लाड, वैष्णवी लाड, संजना हरीमकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली.
जिल्हा परिषदेत जयंती कार्यक्रम
वाशिम : जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही पुष्पअर्पण करून सावित्रीबाईंनी अभिवादन केले. यावेळी विस्तार अधिकारी तुषार जाधव, सचिन गटलेवार, दत्ता ढवणे, राम शृंगारे, सतीश लहामगे, देवानंद धंतुरे, बेले आदींची उपस्थिती होती.
केकतउमरा येथे जयंती कार्यक्रम
वाशिम : तालुक्यातील केकतउमरा येथे महास्थवीर चंद्रमणी बुद्ध विहार येथे राजा प्रसेनजित संस्था व नेहरू युवा बहूद्देशीय मंडळ केकतउमरा यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. मार्गदर्शक म्हणून अंगणवाडी सेविका कमल अंभोरे व दीपाली पट्टेबहादूर होत्या. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पट्टेबहादुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र वाशिम तालुका समन्वयक प्रदीप पट्टेबहादूर, राजाराम पट्टेबहादूर , अशोक भिकाजी पट्टेबहादूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. संचालन सुधीर पट्टेबहादूर यांनी तर आभार प्रदीप पट्टेबहादूर यांनी मानले.
रिसोड येथे जयंती कार्यक्रम
रिसोड : महात्मा फुले समता परिषदेतर्फे रिसोड येथील खोलेश्वर संस्थान येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अरूण क्षीरसागर होते. यावेळी प्रा. जयंत हेलोडे, अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष मडके, सुभाष इरतकर, रायभान जुमडे, नंदू मगर, नारायण इरतकर, संजय जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. संचालन ज्ञानेश्वर मगर यांनी तर आभार संतोष मडके यांनी मानले.
बगडिया महाविद्यालय, रिसोड
रिसोड : येथील उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. महिला शिक्षिका व कर्मचारी प्रा. डॉ. मंगल खेडेकर, संगीता मालवे, नरवाडे यांचा प्राचार्य डॉ. विजय तुरुकमाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.