वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 06:14 PM2019-02-02T18:14:28+5:302019-02-02T18:14:52+5:30
वाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया कृषी पुरस्कारांतर्गत २०१५-२०१६ या वर्षाकरीता शेतकरी आणि संस्थांची निवड करण्यात आली असून, यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकºयांचा समावेश आहे
पुणे येथे होणार सत्कार: कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाºया कृषी पुरस्कारांतर्गत २०१५-२०१६ या वर्षाकरीता शेतकरी आणि संस्थांची निवड करण्यात आली असून, यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठशेतकरी पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकºयांचा समावेश आहे. शासनाने २ फेबु्रवारी रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. पुणे येथे या शेतकºयांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
राज्यात कृषी संलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया व्यक्ती, संस्थांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभुषण, जिजामाता कृषीभुषण (सेंद्रीय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडीत, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषी सेवारत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा आदि कृषी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. या अंतर्गत २०१५ आणि २०१६ या वर्षाकरीता उपरोक्त पुरस्कारांची घोषणा राज्य शासनाने २ फेब्रुवारीच्या निर्णयाद्वारे केली आहे. यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकºयांची निवड झालीअसून, त्यात मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील दिलिप उर्फ रामदास नारायण फुके आणि मालेगाव तालुक्यातील डोंगरेिकन्ही येथील हेमंत वसंतराव देशमुख यांचा समावेश आहे. कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सन २०१५ आणि २०१६ करीता कृषी पुरस्कारांसाठी शेतकरी आणि संस्थांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. निवड झालेल्या शेतकरी, संस्थांना कृषी आयुक्त कार्यालयाद्वारे माहिती देऊन पुणे येथे होणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्कारासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.