वाशिम येथे २२ व २३ डिसेंबर रोजी ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 06:22 PM2018-12-21T18:22:11+5:302018-12-21T18:22:18+5:30
वाशिम : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन व विक्री, परिसंवाद, काव्यवाचन आदी कार्यक्रम होणार असून जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवानिमित्त २२ डिसेंबर रोजी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे रितसर उद्घाटन होईल. हास्यकवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा ‘मिर्झा एक्सप्रेस’ हा हास्यविनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २३ डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम, त्यानंतर ‘ग्रंथ वाचन आणि विकास’ या विषयावर परिसंवाद होईल. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या परिसंवादात राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे शिक्षक मोहन शिरसाट, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी शेख युसुफ सहभागी होतील. ‘वाह वाह क्या बात’ फेम हास्यकवी मनोज मद्रासी यांच्या अध्यक्षतेखाली काव्य वाचन कार्यक्रम होणार असून त्यानंतर ग्रंथोत्सव समारोपीय कार्यक्रम होईल, असे कळविण्यात आले.