मुंगळा शेतशिरात व्हीबीएस फॅक्टरीला आग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:08 AM2021-05-05T05:08:09+5:302021-05-05T05:08:09+5:30
वाशिम जिल्ह्यातून नागपूर-मुंबई हा समृध्दी महामार्ग जात असून, येत्या काही महिन्यांतच दळणवळण सुरू होणार आहे. त्यामुळे या परिसरात विविध ...
वाशिम जिल्ह्यातून नागपूर-मुंबई हा समृध्दी महामार्ग जात असून, येत्या काही महिन्यांतच दळणवळण सुरू होणार आहे. त्यामुळे या परिसरात विविध उद्योगधंदे, कंपनी उभारली जात आहे. खेर्डी येथील बबनराव सातपुते यांनी सहा महिन्यांपूर्वी मुंगळा भाग-२ मधील गट क्रमांक ४०३ मध्ये व्ही.बी.एस.नावाची फॅक्टरी सुरू केली. सोयाबीनच्या कुटारापासून गट्टू बनविण्याचे काम केले जात आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे फॅक्टरीला आग लागली. रात्रीला सोसाट्याचा वारा असल्याचे आगीने रौद्र रूप धारण केले. सुमारे ५६ हजारांची ब्रिकेटिंग मशीन व पॅनल बोर्ड, ११ लाखांचे थ्रेशर युनिट व अँगल यासह ८५ लाखांचे साहित्य, सुमारे चार कोटी रुपयांच्या जवळपास पक्का माल आणि ४५ लाखांचा कच्चा माल असे पाच कोटी ६० लाखांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती सातपुते यांनी दिली. आगीची माहिती मिळताच, वाशीमवरून दोन अग्निशमन दलाची वाहने आली. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले होते. तहसीलदार रवी काळे यांच्या सूचनेनुसार तलाठी उमाळे यांनी पंचनामा केला.