पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागातील ‘व्हीसी संच’ बंद

By admin | Published: September 29, 2016 01:27 AM2016-09-29T01:27:23+5:302016-09-29T01:27:23+5:30

व्हीसी संच धूळ खात पडून; वाशिम जिल्ह्यातील प्रकार.

The 'VC set' in the education section of Panchayat Samiti was closed | पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागातील ‘व्हीसी संच’ बंद

पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागातील ‘व्हीसी संच’ बंद

Next

वाशिम, दि. २८- जिल्हास्तरावरील शिक्षणाधिकार्‍यांना पंचायत समितीस्तरावरील अधिकारी, कर्मचार्‍यांशी विविध विषयावर सूचना करणे आणि आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागात काही वर्षांपूर्वी व्हीसी संच बसविण्यात आले होते. सद्यस्थितीत सदर व्हीसी संच बंद असून धूळखात पडले आहेत.
शिक्षण विभागातील विविध योजना, कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरावर विविध बैठकांचे आयोजन करावे लागते. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसह इतरही कर्मचार्‍यांना जिल्ह्याची वारी करावी लागते. त्यासाठी संबंधित सर्वच अधिकारी, कर्मचार्‍यांचा मोठा वेळ खर्च हो तो आणि त्याचा इतर कामांवरही परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाच्यावतीने पंचायत समिती स्तरावर शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी वेळोवेळी संपर्क व्हावा, त्यांना सूचना व मार्गदर्शन करणे सोपे व्हावे, तसेच बैठकांचा खर्च, वेळ आणि ताण कमी व्हावा म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा करण्यासाठी व्हीसी संच बसविण्यात आले; परंतु यामधील काही व्हीसी संच बंद पडले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांना पुन्हा बैठकांचेच नियोजन करावे लागत आहे.

पंचायत समिती स्तरावरील व्हीसी संचाची माहिती घेतली जाईल. सदर संच बंद का आहेत, याबाबत माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या जातील.
- डी.एच. जुमनाके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वाशिम

Web Title: The 'VC set' in the education section of Panchayat Samiti was closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.