कंत्राटदारांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘व्हीसीए’ उभारणार लढा - जयंत मामीडवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:27 PM2018-10-03T17:27:42+5:302018-10-03T17:28:23+5:30
शासनाकडे न्याय मागितला जाणार असल्याचे प्रतिपादन ‘व्हीसीए’चे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी बुधवार, ३ आॅक्टोबर रोजी येथील स्वागत लॉनमध्ये आयोजित मेळाव्यात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विदर्भ-मराठवाड्यातील कंत्राटदारांना जाणवणाºया अडीअडचणी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विदर्भ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन (व्हीसीए) लवकरच मोठा लढा उभारणार आहे. यामाध्यमातून शासनाकडे न्याय मागितला जाणार असल्याचे प्रतिपादन ‘व्हीसीए’चे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी बुधवार, ३ आॅक्टोबर रोजी येथील स्वागत लॉनमध्ये आयोजित मेळाव्यात केले.
वाशिम जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास ‘व्हीसीए’चे कार्यकारी अध्यक्ष अरविंद वाढोणकर, नितीन डहाके, सुबोध सरोदे, अर्जुन काटे, दिलीप उत्तरवार, सुरेश चाकोळे, बंडूभाऊ देशमुख, श्रीकांत भोयर, राहुल काळे, किशोर मिटकरी, नितीन साळवे, आनंद जैन, संतोष पाटील, सुरेश राठी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
‘व्हीसीए’चे उपाध्यक्ष तथा वाशिम जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष विरेंद्र देशमुख यांनी याप्रसंगी कंत्राटदारांना जाणवणाºया विविध अडचणी उपस्थित केल्या. त्या निकाली काढण्याकरिता सर्व कंत्राटदारांनी एकत्र येवून मोठा लढा उभारण्याची वेळ आता येवून ठेपल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात सन १९८४ मध्ये सर्वप्रथम अकोला जिल्ह्यात कंत्राटदार संघटनेची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याशिवाय अन्य मान्यवरांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले. प्रास्ताविक पंकज बाजड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाशिम जिल्हा कंत्राटदार संघटनेचे सचिव व्ही.बी. जाधव, उपाध्यक्ष व्ही.एम. जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला.