भाजीबाजारात शुकशुकाटच!

By admin | Published: November 13, 2016 02:25 AM2016-11-13T02:25:06+5:302016-11-13T02:25:06+5:30

व्यवसायावर झाला परिणाम; चार दिवसांपासून उलाढाल झाली ठप्प

Vegetable market! | भाजीबाजारात शुकशुकाटच!

भाजीबाजारात शुकशुकाटच!

Next

वाशिम, दि. १२- मागील चार दिवसांपासून पाचशे आणि हजार रुपयांच्या नौटा चलनातून बाद झाल्याचा परिणाम इतर व्यवसायांसह भाजीबाजारवरही झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून वाशिम भाजीबाजारात शुकशुकाट असल्याचे दिसले.
वाशिमचा भाजीबाजार हा नेहमी गजबजलेला राहतो. या ठिकाणी जवळपास प्रत्येक प्रकारची भाजी उपलब्ध राहत असल्याने शहरासह तालुक्यातील ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी या ठिकाणी दररोज येतात. दिवसाला या ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होते. लहानसहान व्यावसायिकांचा रोजचा धंदा हा दोन ते पाच हजार रु पयांपर्यंंत होतो; परंतु केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलना तून बंद केल्या. त्या निर्णयानंतर वाशिमचा भाजीबाजार हा भकास झाला आहे. या ठिकाणी अतिशय क्षुल्लक संख्येत ग्राहक खरेदीसाठी येत असल्याचे दिसत आहे. चलनातील बाद झालेल्या नोटांमुळे शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या नोटांवरच व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे नोटांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अगदी कोट्यवधींचे व्यवहारही शंभर आणि पन्नास रुपयांच्या नोटांमध्ये होत असल्याने या नोटा चिल्लर बाजारातून दिसेनाशा झाल्या आहेत. प्रत्यक्षात भाजी पाबाजारातील व्यवहार या छोट्या नोटांवरच चालतात. आता तया नोटाच नसल्यामुळे भाजीबाजारात अनेक ग्राहक शंभर आणि पाचशेच्या नोटा घेऊन पन्नास शंभर रुपंयांच्या खरेदीसाठी बाजारात येत आहेत. या नोटा बंद झाल्यामुळे विक्रेते त्या नोटा घेत नाहीत. एका मोठय़ा विक्रेत्याकडे भाजीबाजारातील व्यवहाराची माहिती जाणून घेतली असता. आमचे सर्व व्यवहार शंभर आणि पन्नासच्या नोटांअभावी ठ प्प झाल्याचे त्याने सांगितले. पाचशे आणि हजार रुपयांची नोट बंद होण्यापूर्वी दिवसाला पाच ते आठ हजार रुपयांपर्यंंतची विक्री होत असताना आता केवळ पाचशे हजार रुपयांवरच धंदा आला असेही त्याने सांगितले. लहानसा व्यवसाय असलेल्या भाजी विक्रेत्याला विचारले असता आमचा दिवसाचा धंदा एक ते दोन हजार रुपयांचा असतो; परंतु लोकांकडे शंभर, पन्नासच्या नोटाच नसल्यामुळे धंद्यावर मोठा परिणाम झाला आणि दोनशे रुपयांपर्यंतच विक्री होत असल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Vegetable market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.