गैरसोयीत अडकला वाकद येथील भाजीबाजार : बाजारातच सांडपाणी; ओट्यांचा वापरच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:47 PM2018-02-10T14:47:02+5:302018-02-10T14:48:47+5:30
वाकद (वाशिम) - रिसोड तालुक्यातील वाकद येथील भाजीबाजार गैरसोयीत अडकला असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाकद (वाशिम) - रिसोड तालुक्यातील वाकद येथील भाजीबाजार गैरसोयीत अडकला असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाकद येथे भाजीबाजार भरत असल्याने गावकºयांची गैरसोय टळली आहे. व्यापाºयांसाठी ओट्याची सुविधा म्हणून १५ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भाजीबाजारात ओटे बांधण्यात आले. त्यामुळे येथे बाजार भरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, नियोजनाअभावी या ओट्यांचा वापर होत नाही. परिणामी, व्यापाºयांना अरूंद जागेत बसावे लागत आहे. शिवाय सदर जागेत सांडपाणी येत असल्याने भाजीपाला दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरूंद जागेत बाजार भरत असल्याने आणि सायंकाळी बाजारात ग्राहकांची जास्त गर्दी होत असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अशा गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एका जणाच्या हातातील मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. एकिकडे बाजारओटे ओस पडलेले आहेत तर दुसरीकडे अरूंद जागेत भरणाºया बाजारात ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे. बाजार ओट्याजवळ काही साहित्य पडून आहे. या ओट्याजवळील साहित्य हटवून व्यापाºयांना ओट्यावर बसण्याची सक्ती करावी, अशी मागणी गावकºयांमधून जोर धरत आहे. अरूंद जागा आणि त्यातच सांडपाणी यामुळे भाजीबाजारात अस्वच्छता पसरण्याची शक्यता बळावली आहे. याकडेदेखील प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.