अनलॉकनंतर भाजीपाला ५० टक्के महागला; टोमॅटो दुपटीने महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 12:10 PM2021-06-22T12:10:05+5:302021-06-22T12:10:12+5:30
Vegetables become 50% more expensive after unlock : १० रुपये किलो असलेले टोमॅटो आता २० ते २५ रुपये किलो या दराने मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बाजारपेठेवरील निर्बंध हटणे, आवक घटणे आदी कारणांमुळे अलिकडच्या काळात भाजीपाल्याचे भाव जवळपास ४० ते ५० टक्क्याने महाग झाले आहे. पूर्वी १० रुपये किलो असलेले टोमॅटो आता २० ते २५ रुपये किलो या दराने मिळत आहे.
दुसºया लाटेत मार्च ते मे या तीन महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्बंध कठोर केले. जिल्हा प्रशासनानेदेखील मे महिन्यात निर्बंध कठोर केल्याने निर्धारीत वेळेतच भाजीपाला विकावा लागत होता. त्यामुळे भाजीपाल्याचे दर अतिशय कमी होते. आता जिल्हा अनलॉक झाल्याने भाजीबाजारावर वेळेचे बंघन नाही तसेच पावसामुळे भाजीपाला खराब होत असल्याने आवकही घटत आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा
शेतात राबराब राबून भाजीपाला पिकविला जातो. ठोकमध्ये भाजीपाल्याला फारसे भाव मिळत नाहीत. पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने पदरी निराशा पडते. भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही. ठोक पद्धतीने कमी दरात भाजीपाला घेतला जातो.
- गजानन लाड, शेतकरी