रानभाज्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:04+5:302021-08-18T04:48:04+5:30
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., ...
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा ‘आत्मा’चे प्रभारी प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, रानभाज्यांचे महत्त्व लोकांना समजावे, या रानभाज्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी गतवर्षीपासून राज्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. रानभाज्यांचे योग्य मार्केटिंग झाल्यास यामाध्यमातून शेतकरी कुटुंबांना आर्थिक हातभार लागण्यास मदत होईल. शेतकरी गट, महिला बचतगट यांच्या माध्यमातून याकरिता प्रयत्न व्हावेत. विशेषतः महिला शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले. तसेच शेतकरी समृद्ध झाला तरच आपला जिल्हा, आपले राज्य समृद्ध होईल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यात ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान तालुकास्तरावर रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गतवर्षी व यावर्षीसुद्धा रानभाजी महोत्सवाला शेतकरी व ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
००००००००००००००००
‘आत्मा’शी संलग्न ८४ गटांचा सहभाग
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये ‘आत्मा’शी संलग्न ८४ गटांनी सहभाग घेतला. याठिकाणी ६८ प्रकारच्या रानभाज्या विक्री करता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ‘आत्मा’ कार्यालयाने तयार केलेल्या रानभाज्यांची माहिती देणाऱ्या ‘विदर्भातील रानभाज्या’ या पुस्तिकेचे विमोचन यावेळी पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.