पोलिसांकडून वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:18 AM2021-02-06T05:18:10+5:302021-02-06T05:18:10+5:30
................. खासगी वाहनांमुळे महामंडळाचे नुकसान शेलुबाजार : येथून बसथांब्यानजीक थोड्या अंतरावर खासगी वाहने उभी राहून प्रवाशांची पळवापळवी करीत ...
.................
खासगी वाहनांमुळे महामंडळाचे नुकसान
शेलुबाजार : येथून बसथांब्यानजीक थोड्या अंतरावर खासगी वाहने उभी राहून प्रवाशांची पळवापळवी करीत आहेत. यासह वाशिम ते अकोला या मार्गावरही खासगी वाहनांची संख्या वाढल्याने एस.टी.ला प्रवासी मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे. बस येण्याच्या वेळआधीच खासगी वाहने येऊन प्रवासी घेऊन जात असल्याने एसटी महामंडळाचे नुकसान हाेत आहे. याकडे मात्र संबंधितांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
.............
आदिनाथ बदर यांना पीएच.डी.
रिसाेड : स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय येथील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्रा. आदिनाथ डी. बदर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली. त्यांनी डॉ. के.पी. हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली “सिंथेसिस ऑफ सम नायट्रोजन, ऑक्सिजन ॲण्ड सल्फर कंटेनिंग बायोलॉजिकल ॲक्टिव्ह हेटरॉसायलीक कम्पाउंड्स” या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता.
.......................
८६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
रिठद : ट्रिपल सीट यासह वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली जात आहे. गत दोन दिवसांत रिठद परिसरासह रिसोड तालुक्यातील ८६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाहनचालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
................
रस्त्यावर खड्डे, वाहनचालक
केनवड : बसथांब्यानजीक रस्त्यावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांतून केली जात आहे. वाहन चालविताना खड्डे वाचविण्यासाठी चालकांना माेठी कसरत करण्याची वेळ आली आहे.
.....................
पल्स पाेलिओ माेहीम यशस्वी
ताेंडगाव : शासनाच्या निर्देशानुसार परिसरात ३१ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत या भागांत आरोग्य विभागाच्या पथकाने ० ते ५ वर्षे वयोगटातील हजारो बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजले. यावेळी काेराेना नियमांचे पालन करण्यात आले.
..................