उड्डाणपुलाच्या संथ कामामुळे वाहनधारकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:41+5:302021-03-09T04:44:41+5:30
वाशिम येथे गत ५ ते ६ वर्षांपासून वाशिम ते पुसद मार्गावरील उडाणपुलाचे काम सुरु आहे. सुरुवातीला अतिशय वेगाने सुरु ...
वाशिम येथे गत ५ ते ६ वर्षांपासून वाशिम ते पुसद मार्गावरील उडाणपुलाचे काम सुरु आहे. सुरुवातीला अतिशय वेगाने सुरु झालेले काम मध्यंतरी जवळपास एक वर्ष काही वादामुळे बंद पडले हाेते. हे काम आता पुन्हा सुरु झाले असून अतिशय संथगतीने केल्या जात आहे. याचा वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात फटका बसत आहे. विशेष म्हणजे या मार्गावरुन माेटारसायकलने प्रवास करणारे वाहनचालक तर पूर्णपणे धुळीने माखून जात आहेत. या रस्त्यावरील दुकानदार, रहिवासी तर धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. अनेकांनी आपल्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर प्लास्टिक लावून ठेवलेले दिसून येत आहे. दिवसातून या रस्त्यावर तीन ते चार वेळा वाहतूक विस्कळीत हाेत आहे. या कामाला गती देण्याकरिता संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांतून केली जात आहे.