जिल्ह परिषद परिसरात ‘नो पार्किंग’मध्येच वाहनांची पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 04:56 PM2020-12-20T16:56:10+5:302020-12-20T16:56:57+5:30
Washim News वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
वाशिम : जिल्हा परिषद परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडत असून, ‘नो पार्किंग’मध्येच वाहने उभी केली जात आहेत. कुठेही वाहने उभी केली जात असल्याने याप्रकरणी कारवाई केव्हा होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिक येतात. जिल्हा परिषद परिसरात वाहने ठेवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ‘नो पार्किंग’च्या रेषा आखल्या होत्या. वाहनांकरीता पार्किंगचे नियमही ठरविण्यात आले. ‘नो पार्किंग’मध्ये वाहन दिसल्यानंतर वाहनाची हवाही सोडण्यात आली होती. परंतू, त्यानंतर कारवाईची मोहिम थंडावली. पार्किंगच्या दिशेने सूचना फलक लावण्यात आलेल्या ठिकाणीच वाहने उभी करण्यात येतात. काही वाहने तर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षाकडे जाणाºया प्रवेशद्वारालगतच उभी करण्यात येतात. यामध्ये दुचाकीसह चारचाकी वाहनांचादेखील समावेश आहे. जिल्हा परिषद परिसरात वाहनांकरीता नियमावली ठरवून दिलेली असतानाही याचे पालन काही कर्मचारी, नागरीक, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, वाहन चालकांकडून होत नसल्याचे दिसून येते. अनेकदा वाहनचालक कुठेही वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतुकीची कोंडीदेखील होते. कुठेही वाहने उभी करणाºयांविरूद्ध दंडात्मक कारवाई होणे अपेक्षीत आहे.