तालुकास्तरावरच वाहन नोंदणीची सुविधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:24+5:302021-07-01T04:27:24+5:30
वाशिम : मोटार वाहन चालक, मालक यांच्या सोयीसाठी वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहनचालक परवाना कामकाजासाठी ...
वाशिम : मोटार वाहन चालक, मालक यांच्या सोयीसाठी वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहनचालक परवाना कामकाजासाठी १ जुलैपासून डिसेंबर २०२१ पर्यंत तालुकानिहाय मासिक शिबिराचे आयोजन केले आहे.
वाहन नोंदणी, तपासणी, वाहनचालक परवाना आदी कामांसाठी अनेकांना वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात यावे लागते. तालुकास्तरीय वाहनचालक, मालकांची गैरसोय टाळण्यासाठी अनलॉकच्या काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत वाहन नोंदणी, तपासणी, चालक परवाना आदी कामकाजासाठी तालुकानिहाय शिबिर घेण्यात येणार आहे. कारंजा लाड येथे ५ जुलै, १९ जुलै, ४ ऑगस्ट, २० ऑगस्ट, ६ सप्टेंबर, २० सप्टेंबर, ४ ऑक्टोबर, २० ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर, १८ नोव्हेंबर, ६ डिसेंबर व २० डिसेंबर, रिसोड येथे ९ जुलै, ६ ऑगस्ट, ८ सप्टेंबर, ८ ऑक्टोबर, ८ नोव्हेंबर व १० डिसेंबर, मानोरा येथे १२ जुलै, १० ऑगस्ट, १३ सप्टेंबर, ११ ऑक्टोबर, १० नोव्हेंबर व १३ डिसेंबर, मंगरूळपीर येथे १६ जुलै, १३ ऑगस्ट, १७ सप्टेंबर, १३ ऑक्टोबर, १५ नोव्हेंबर व १७ डिसेंबर रोजी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यापैकी कोणत्याहीदिवशी शासकीय सुटी जाहीर झाल्यास दुसऱ्या कार्यालयीन दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. सकळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.