वाहन विक्रीतून झाली कोट्यवधींची उलाढाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:59 PM2017-10-23T15:59:40+5:302017-10-23T16:02:28+5:30
दिवाळीच्या मुहुर्तावर येथील विविध दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शो रूममधून जवळपास १० ते ११ कोटी रूपयांच्या वाहनांची विक्री झाल्याचा दावा विक्रेत्यांनी केला.
वाशिम : गतवर्षीसारखे यावर्षीच्या दिवाळीला वाहन बाजाराला ‘अच्छे दिन’ नसले तरी दसºयानंतर दिवाळीपर्यंत बºयापैकी वाहनांची विक्री झाली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर येथील विविध दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शो रूममधून जवळपास १० ते ११ कोटी रूपयांच्या वाहनांची विक्री झाल्याचा दावा विक्रेत्यांनी केला.
सन २०१६ चा अपवाद वगळता त्यापूर्वीच्या तीन वर्षांत जिल्हावासियांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे दिवाळीनिमित्तच्या बाजारपेठेतील उलाढालही त्यावेळी काही अंशी मंदावली होती. सन २०१६ मध्ये सुरूवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावून सर्वांनाच ‘खूष’ केले. परिणामी, दसरा व दिवाळीच्या दरम्यान वाहन बाजार तेजीत राहिला होता. गतवर्षी वाशिम शहरासह मालेगाव, रिसोड, शेलुबाजार, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर येथील शोरूममध्ये विविध प्रकारची वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. १७ ते १८ कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याचा दावा त्यावेळी वाहन विक्रेत्यांनी केला होता. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसात खंड होता. परतीच्या पावसानेदेखील शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले. याचा परिणाम वाहन खरेदीवर जाणवला. दसºयापर्यंत तर वाहन बाजार मंदितच होता. दसºयादरम्यान थोडाफार तेजीत आलेला वाहन बाजार मध्यंतरी मंदावला. दिवाळीदरम्यान चार-पाच दिवस वाहन बाजाराने बºयापैकी अच्छे दिन अनुभवले. वाहन खरेदीवर विविध प्रकारच्या आकर्षक योजना व सवलती जाहिर केल्याने ग्राहकांची दिवाळीदरम्यान बºयापैकी पसंती मिळाली, असे वाहन विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन घरी नेण्याचे नियोजन म्हणून काही ग्राहकांनी अगोदरच बुकींग करून ठेवली होती. यामुळे मुहूर्तावर गाडी देणे सोपे झाले, असे वाहन विक्रेते रौनक टावरी यांनी सांगितले. यावर्षी दिवाळीदरम्यान विविध प्रकारच्या वाहन विक्रीतून जवळपास १० ते ११ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा वाहन विक्रेत्यांनी केला.