वैध योग्यता प्रमाणपत्र नसतानाही वाहने धावताहेत रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:35 PM2018-09-26T14:35:50+5:302018-09-26T14:38:01+5:30
वाशिम : योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेले, योग्यता प्रमाणपत्र आहे; परंतू वाहन सार्वजनिक रस्त्यावर चालण्यास धोकादायक असतानाही अशी वाहने सर्रास रस्त्यावरून धावत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेले, योग्यता प्रमाणपत्र आहे; परंतू वाहन सार्वजनिक रस्त्यावर चालण्यास धोकादायक असतानाही अशी वाहने सर्रास रस्त्यावरून धावत आहेत. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी परिवहन ८ ते २३ आॅक्टोबरदरम्यान तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेल्या वाहनांसंबंधी कोणती कारवाई करावी, याबाबतच्या स्पष्ट सूचना उपप्रादेशिक परिवहन विभागाला २४ सप्टेंबर रोजी मिळालेल्या आहेत.
रस्ते अपघाताच्या घटनांना आळा बसविण्याच्या दृष्टिकोनातून वाहने सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वाहने सुस्थितीत नसतानाही सार्वजनिक रस्त्यांवरून धावत असल्याने अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळण्यात फारसे यश येत नसल्याने दिसून येते. या पृष्ठभूमीवर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणी मोहिम परिवहन विभागातर्फे राबविली जाते. यापूर्वी प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने अद्यापही अनेक वाहने वैध योग्यता प्रमाणपत्र नसतानाही रस्त्यांवरून धावत आहेत. या प्रकाराला चाप बसविण्यासाठी परिवहन विभागातर्फे राज्यभरात ८ ते २३ आॅक्टोबर २०१८ या दरम्यान तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने आढळून आल्यास सदर वाहन नजीकच्या दुरूस्ती केंद्रात अटकावून ठेवणे आणि सदर वाहनं दुरूस्तीसाठी प्राप्त झाल्याचे दुरूस्ती केंद्रचालकाचे प्रमाणपत्र तपासणी अधिकाºयांना घ्यावे लागणार आहे. वैध योग्यता प्रमाणपत्र आहे; परंतू वाहन सदोष आहे, असे आढळल्यास तपासणी अधिकाºयांनी सदर वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र निलंबित करावे व वाहन हे नजीकच्या दुरूस्ती केंद्रात दुरूस्तीसाठी सुपूर्द करावे लागणार आहे.
वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासंदर्भात ८ ते २३ आॅक्टोबरदरम्यान तपासणी मोहिम राबविली जाणार आहे.
- जयश्री दुतोंडे, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम.