वाहने सावकाश चालवा, मोकाट जनावरे वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:19+5:302021-09-22T04:46:19+5:30
मागील अनेक वर्षांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत. अकाेला-आर्णी, ...
मागील अनेक वर्षांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत. अकाेला-आर्णी, नांदेड-यवतमाळ, अशा महामार्गांसह अकोला चौक, बसस्थानक, आंबेडकर चौक, अशा मध्यवर्ती भागांत रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
००००००००००००००००
मोकाट गुरांचा वाली कोण
शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुरे ठाण मांडून बसतात. एखादवेळी अपघात घडून गुरासह वाहनचालकाचा जीव जाण्याची भीती आहे. त्यामुळे गुरांच्या मालकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. परंतु, असे होत नसल्याने या गुरांचा वाली काेण, ते कळणेही कठीण आहे.
०००००००००००००००००००
या मार्गावर वाहने हळू चालवा
-अकोला चौक-बिरबलनाथ चौक
- आंबेडकर चौक-सुभाष चौक
-अकोला चौक-बसस्थानक,
-बसस्थानक-बायपास रोड
०००००००००००००
वर्षभरात एकही कारवाई नाही.
मंगरुळपीर शहरातील विविध मार्गावर गुरांचे कळप सकाळपासून रात्री उशिरापर्यत ठिय्या मांडतात. त्यामुळे चालकांना मार्ग काढणे कठीण जाते. यातून एखादवेळी अपघाताची भीती असल्याने नगर पालिकेने कारवाई करण्याची अपेक्षा असताना गत वर्षभरात या प्रकरणी एकही कारवाई झालेली नाही.
०००००००००००००००
कोट: रस्त्यांवर ठाण मांडून बसणाऱ्या गुरांमुळे अपघाताची भीती लक्षात घेता पालिकेतील संबंधित यंत्रणेला पाहणी करून ही समस्या सोडविण्याची सूचना देण्यात येईल.
-दीपक इंगोले,
मुख्याधिकारी, मंगरुळपीर