अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना मिळणार स्टिकर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 03:46 PM2020-03-27T15:46:33+5:302020-03-27T15:49:46+5:30

अडचणी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यलयात नियंत्रण कक्ष २६ मार्चपासून सुरू केला आहे.

Vehicles supplying essential goods will get stickers | अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना मिळणार स्टिकर्स

अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना मिळणार स्टिकर्स

Next
ठळक मुद्देउपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नियंत्रण कक्ष आहे. सहकार्य करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया वाहनांना परिवहन विभागामार्फत स्टिकर्स उपलब्ध करून देण्याच्या परिवहन विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात सुरू झाली असून,  जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीविषयी वाहतूकदारांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यलयात नियंत्रण कक्ष २६ मार्चपासून सुरू केला असून, हा कक्ष २४ तास सेवेत राहणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया वाहनांना परिवहन विभागामार्फत स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत वाहतूकदारांच्या झालेल्या बैठकीत २५ मार्च रोजी घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतुकदारांनी स्टिकर्स प्राप्त करून घेवून आपल्या वाहनांच्या दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणाºया वाहतूकदारांना संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडून स्टिकर्स पुरविली जाणार आहेत. वाहनाच्या चालकांना तसेच माल भरणारे, उतरविणारे कामगार यांना, त्यांच्या घरापासून वाहनापर्यंत तसेच वाहतुकीचे काम पूर्ण झाल्यानंतर घरापर्यंत जाण्यासाठी जर एखादी जीप, कार अशा वाहनांचा वापर वाहतूकदार करीत असतील तर या वाहतुकीला सुद्धा अत्यावश्यक सेवा समजून त्यासाठी स्टिकर्स दिले जातील. या संदर्भात वाहतुकदारांनी अशा चालकांना, कामगारांना ओळखपत्र पुरवावे किंवा संघटनेच्या लेटरहेडवर अशा व्यक्तींची नावे नमूद करून सदर वाहनात ठेवावीत. या वाहतुकीसाठी परिवहन अथवा पोलीस विभाग आवश्यक सहकार्य करणार आहे. ज्या गोदामांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात आला आहे, अशा गोदामांपर्यंतची किंवा गोदामापासून बाहेर जाणारी वाहतूक देखील आवश्यक वाहतूक समजण्यात येईल व या संदर्भाने आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसंदर्भात वाहतूकदारांना काही अडचणी आल्यास नियंत्रण कक्ष किंवा या कक्षातील ८६६८८४४७०० व ७७०९३५८७७७ या क्रमांकावर साधावा, असे आवाहन सय्यद यांनी केले.

Web Title: Vehicles supplying essential goods will get stickers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.