कोरोना तपासणीची नायब तहसीलदारांकडून पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:21+5:302021-04-16T04:41:21+5:30
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने तहसीलदार धीरज मांजरे यांनी तालुक्यातील सर्व व्यावसायिकांना कोरोना तपासणी करून घेण्याचा ...
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने तहसीलदार धीरज मांजरे यांनी तालुक्यातील सर्व व्यावसायिकांना कोरोना तपासणी करून घेण्याचा आदेश पारित करून तपासणी न केल्यास प्रतिष्ठाने सील करण्यात येणार असल्याचे बजावले हेाते. त्या आनुषंगाने व्यावसायिकांनी कोरोना तपासणी केली की नाही याची पडताळणी करण्याकरिता निवासी नायब तहसीलदार विलास जाधव यांनी १३ एप्रिल रोजी कामरगाव येथे भेट देऊन व्यावसायिकांची पडताळणी केली. यादरम्यान ज्या व्यावसायिकांनी तपासणी केली नव्हती त्यांची तत्काळ कामरगाव येथील जि. प. विद्यालयातील तपासणी शिबिरात तपासणी करण्यात आली. यावेळी काही व्यावसायिकांनी तपासणीसाठी विरोध केल्याचेही दिसून आले. या पडताळणीदरम्यान त्यांच्यासमवेत मंडळ अधिकारी देवेंद्र मुकुंद, तलाठी विवेक नागलकर, ग्रामसेवक गोपाल मिसाळ, सरपंच साहेबराव तुमसरे व पोलीस उपनिरीक्षक कपिल म्हस्के यांच्यासह पोलिसांची उपस्थिती होती.