अकरावी प्रवेशप्रक्रियेची उद्यापासून पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:30 PM2021-01-11T12:30:29+5:302021-01-11T12:30:39+5:30
Education Sector News प्रवेशप्रक्रियेची पडताळणी शिक्षण विभागाकडून १२ जानेवारीपासून करण्यात येणार आहे.
वाशिम : विविध महाविद्यालयांत इयत्ता ११ वीसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. या प्रवेशप्रक्रियेची पडताळणी शिक्षण विभागाकडून १२ जानेवारीपासून करण्यात येणार असून, यासाठी दाखल खारीज रजिस्टर, टी. सी. रजिस्टर, प्रवेशासंबंधीची इतर कागदपत्रे व वर्ग हजेरी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना शिक्षणाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिल्या.
१२ ते २३ जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील ११वी प्रवेशाची पडताळणी केली जाणार आहे. १२ जानेवारी रोजी मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील प्रवेशाची पडताळणी शिवाजी विद्यालय वाशिम येथे, १९ जानेवारी रोजी रिसोड तालुक्यातील पडताळणी भा.मा. विद्यालय रिसोड येथे, २२ जानेवारी रोजी वाशिम तालुक्यातील पडताळणी शिवाजी विद्यालय वाशिम येथे होणार आहे.