अनुदान घेतलेल्या शौचालय लाभार्थींची होणार पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:59 AM2020-02-28T10:59:24+5:302020-02-28T10:59:33+5:30
अनुदानाचा लाभ लाटणाºया; परंतू शौचालय बांधकाम न करणाºया लाभार्थींमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वाशिम : यापूर्वी विविध योजनेतून शौचालय अनुदानाचा लाभ घेणाऱ्या; परंतु सद्यस्थितीत शौचालय नसलेल्या कुटुंबांची माहिती जिल्हा तसेच तालुकास्तरावर उपलब्ध करण्याच्या सुचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २० फेब्रुवारी रोजी दिल्या. त्यादृष्टीने अमरावती विभागात सदर माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. या निर्णयामुळे शौचालयाचे अनुदान लाटणाºया लाभार्थींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाच्या घरी शौचालय असावे यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सन २०१२ च्या वेळी पायाभूत सर्वेक्षणात समाविष्ट असणारे आणि सद्यस्थितीत शौचालय नसणारे कुटुंब मयत अथवा कायमस्वरुपी अस्तित्वात नसेल तर सदर कुटुंबांचा समावेश माहिती संकलनाच्या यादीमध्ये करण्यात येऊ नये, अशा सूचना शासनस्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत. यापूर्वी विविध योजनेतून शौचालय बांधकाम झाले असून, संबंधित लाभार्थींना अनुदानही वाटप करण्यात आले आहे. मात्र, काही कुटुंबांकडे शौचालय नसल्याच्या तक्रारी असल्याने शौचालयासाठी अनुदान घेतलेली; परंतू सद्यस्थितीत शौचालय नसलेल्या कुटुंबांची माहिती जिल्हा तसेच तालुका स्तरावर उपलब्ध करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छ विभागाने दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने अमरावती विभागात ही माहिती संकलित केली जात आहे. या कामी स्वच्छताग्रही, ग्रामसेवक यांचेही सहकार्य घेतले जात आहे. अनुदानाचा लाभ लाटणाºया; परंतू शौचालय बांधकाम न करणाºया लाभार्थींमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शासन निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात यापूर्वी विविध योजनेतून शौचालय अनुदान घेतलेल्या; परंतू सद्यस्थितीत शौचालय नसलेल्या कुटुंबांची माहिती विहित प्रपत्रात संकलित केली जात आहे.
- दीपक कुमार मीना,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम