जनावरांचे दवाखाने आता एकाच सत्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:33 AM2021-01-15T04:33:58+5:302021-01-15T04:33:58+5:30
जनावरांचे दवाखाने राज्यात उभारल्यापासून त्यांची वेळ फेब्रुवारी ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत वेगवेगळी होती. फेब्रुवारी ते ...
जनावरांचे दवाखाने राज्यात उभारल्यापासून त्यांची वेळ फेब्रुवारी ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत वेगवेगळी होती. फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत सकाळी सात ते दुपारी सव्वाबारा आणि पुन्हा दुपारी चार ते सायंकाळी सहा अशी दोन सत्रांमध्ये होती. तर ऑक्टोबर ते जानेवारी या थंडीच्या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी सव्वा आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच अशी होती. शनिवारी मात्र सकाळी एकाच सत्रात कामकाज होत असे. दुपारी सुटी असायची. आता बदललेल्या वेळापत्रकानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी साडेचारपर्यंत अशी वेळ निर्धारित करण्यात आली आहे. त्यात दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत जेवणासाठी सुटी देण्यात आली आहे. शनिवारची वेळ सकाळी आठ ते दुपारी एक अशी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी चोवीस तास सेवा देणे आवश्यक आहे. बदललेल्या त्या वेळेचा आदेश श्रेणी एक व श्रेणी दोनचे सर्व पशुवैद्यकीय दवाखाने, तालुका लघु सर्व चिकित्सा, जिल्हा पशु सर्वचिकित्सालय व फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी लागू करण्यात आले आहे.