पक्ष संघटनासाठी वंचित बहुजन आघाडीचा विदर्भ दाैरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:50+5:302021-07-20T04:27:50+5:30

वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक १८ जुलै राेजी स्थानिक विठ्ठलवाडी भवनात घेण्यात आली त्यावेळी त्या बाेलत ...

Vidarbha scope of deprived Bahujan Aghadi for party organization | पक्ष संघटनासाठी वंचित बहुजन आघाडीचा विदर्भ दाैरा

पक्ष संघटनासाठी वंचित बहुजन आघाडीचा विदर्भ दाैरा

Next

वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक १८ जुलै राेजी स्थानिक विठ्ठलवाडी भवनात घेण्यात आली त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. यावेळी राज्य उपाध्यक्ष गाेविंद दळवी, महिला आघाडी महासचिव डाॅ. अरुंधती सिरसाट, युवा अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, प्रदेश सदस्या किरण गिऱ्हे, महिला जिल्हाध्यक्षा प्रमिला शेवाळे, मंगरुळपीर नगराध्यक्षा डाॅ. गजाला खान, कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढाेके, जि.प. समाजकल्याण सभापती वनिता देवरे, जिल्हा मार्गदर्शक डाॅ. नरेश इंगळे, जिल्हा सल्लागार डाॅ. सिद्धार्थ देवळे, वैशाली मेश्राम, जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे यांची उपस्थिती लाभली हाेती. यावेळी प्रभारी अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पक्ष देशपातळीवर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे माेलाचे मार्गदर्शन लाभत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव साेनाजी इंगळे, वसंतराव हिवराळे, भूषण माेरे, विनाेद भगत, राजाभाऊ चव्हाण, समाधान भगत, उत्तम झगडे, प्रदीप खंडारे, दत्तराव गाेटे, सुभाष राठाेड, दिलीप भगत, सुरेश भगत आदींनी परिश्रम घेतले.

वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या बैठकीत उपस्थित माेठ्या प्रमाणातील कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे इतर राजकीय पक्षात चर्चा हाेत आहे. आघाडी जिल्ह्यात पाया भक्कम करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Vidarbha scope of deprived Bahujan Aghadi for party organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.