VIDEO - बालू चौकात आडोशाआड सर्रास चालतो जुगार

By Admin | Published: July 1, 2017 03:19 PM2017-07-01T15:19:12+5:302017-07-01T16:31:22+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम, दि. 1-   शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस विभागाने कात टाकली ...

VIDEO - Aadoshaad runs mostly in the sand chowk | VIDEO - बालू चौकात आडोशाआड सर्रास चालतो जुगार

VIDEO - बालू चौकात आडोशाआड सर्रास चालतो जुगार

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम, दि. 1-   शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस विभागाने कात टाकली आहे. दररोज होत असलेल्या कारवायांमुळे अवैध धंदयावर चांगलाच वचक निर्माण झाला आहे. असे असतांनाही शहरातील सर्वात गजबजलेला चौक म्हणून प्रसिध्द असलेल्या बालु चौकामध्ये आडोशाआड सर्रास जुगार खेळल्या जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन लोकमत चमुने ३० जून रोजी केले.
शहरातील सर्वात गजबजलेला व प्रसिध्द बाबुलाल हलवाई मिठाईच्या दुकानामागे दरराजे जुगार चालत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरुन लोकमतच्या चमुने स्टिंग ऑपरेशन केले असता आढळून आली. ३० जून रोजी आडोशाचा सहारा घेत ४ ते ५ इसम पत्यांचा डाव पैशावर खेळतांनाआढळून आले. जुगार खेळत असतांना प्रत्येक जण थोडया थोडया वेळाने उठून आजुबाजुला आपल्याला कोणी पाहत तर नाही ना याचा शोध घेतांना दिसून आले.  
विशेष म्हणजे दररोज येथे नवनविन युवक येवून जुगार खेळत असल्याची माहिती आहे. जिल्हयातील पोलीस विभागात ‘अलर्ट’ असतांना सुध्दा त्यांच्या डोळयात धुळफेक करुन जुगारी आपला कार्यक्रम पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागाने याकडे लक्ष देवून या प्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे. 
 
असे केले स्टिंग
शहरातील बालु चौकात दिवसभर जुगार चालत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरुन लोकमत चमुने जुगार स्थळाची पाहणी केली असता बालु चौकात असलेल्या प्रसिध्द हलवाईच्या दुकानामागे आडोशाचा आधार घेवून काही युवक जुगार खेळतांना आढळून आलेत. या युवकांचा जुगार खेळतांना छायाचित्र व व्हिडिओ काढला असतांना सुध्दा त्यांना कळाले नाही. ते खेळण्यात मग्न असले तरी थोडया थोडया वेळात उठून परिस्थितीचा कानोसा घेतांना आढळून आलेत. 
https://www.dailymotion.com/video/x8456xm

Web Title: VIDEO - Aadoshaad runs mostly in the sand chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.