VIDEO: वाशिममध्ये अॅसीड टाकून पेटवली झाडे
By Admin | Published: October 3, 2016 08:05 PM2016-10-03T20:05:49+5:302016-10-03T20:10:03+5:30
वाशिम जिल्ह्यात झाडांच्या मुळाशी ‘अॅसीड’ टाकून अनेक झाडं पेटवली जात आहेत. लाकूड तस्करांनी ज्वलनशील पदार्थ अथवा ‘अॅसीड’ टाकून
सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 3- वाशिम जिल्ह्यात झाडांच्या मुळाशी अॅसीड टाकून अनेक झाडं पेटवली जात आहेत. लाकूड तस्करांनी ज्वलनशील पदार्थ अथवा अॅसीड टाकून मोठमोठे वृक्ष पेटवून देण्याचा प्रकार अवलंबिला असून अशाप्रकारे सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्याकामी वनविभागाला मात्र अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कारंजा-कामरगांव, रिसोड-वाशिम, वाशिम-अनसिंग, वाशिम-मालेगाव आदी मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून लाकूड तस्करांकडून वृक्षतोडीसाठी अजब फंडा लढविला जात आहे. महाकाय वृक्षाच्या मुळाशी ज्वलनशील पदार्थ अथवा चक्क ‘अॅसीड’ टाकून वृक्षाची मुळे खिळखिळी केली जातात. दुस-या अथवा तिस-या दिवसापर्यंत सदर झाड मुळासकट आपसूकच कोसळते. त्यानंतर लाकूड तस्करांकडून या झाडांची तोड करून काळ्या बाजारात त्याची विक्री करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे.