VIDEO- पक्षी आतुरतेने पाहतात ‘राम’ची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:19 PM2017-07-21T15:19:10+5:302017-07-21T15:19:10+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 21- कोणतेही चांगले कार्य केल्यास जवळीक निर्माण होते यात दुमत नाही. मंगरुळपीर तालुक्यातील एक ‘राम’ ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 21- कोणतेही चांगले कार्य केल्यास जवळीक निर्माण होते यात दुमत नाही. मंगरुळपीर तालुक्यातील एक ‘राम’ नामक पोलीस कर्मचारी आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे चांगलेच परिचित असून ते आपल्या मृदू , संयमी स्वभावाने परिचित आहेत. त्याच्या या स्वभावाची चर्चा अगदी सगळीकडेच आहे. शिवाय पशु-पक्षीसुध्दा त्यांची येण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे.
शेलुबाजार येथील रहिवासी असलेले रामविलास गुप्ता परिसरात ‘राम’ या नावाने प्रसिध्द आहेत. त्यांना पशु-पक्ष्यांचा लळा असल्याने ते त्यांच्यासाठी नवनविन उपक्रम नेहमीच राबवितात. त्यात अनेकजण त्यांना मुर्खातही काढतात परंतु कोणतीही तमा न बाळगता ते आपले कार्य प्रामाणिकपणे सुरु ठेवत असल्याने आज पशु-पश्यांनाही त्यांची भाषा, त्यांचे हावभाव कळत असून मोठया आतुरतेने पक्षी त्यांची वाट पाहतांना दिसून येतात. राम हे मालेगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असून दररोज शेलुबाजार येथून येणे जाणे करतात. दरम्यान, जऊळका रेल्वे फाटा लागत असून येथे असलेल्या वृक्षांवर मोठया प्रमाणात पक्षांचा वावर आहे. यांनी गत तीन ते चार वर्षांपासून येथे येवून त्यांना खाद्य पुरविण्याचे काम केले. सुरुवातील त्यांना पक्षी घाबरायचे आता मात्र ते दूरुनच दिसले की पक्षांची किलबिलाट सुरु होवून जाते. त्यांनी त्यांची मोटारसायकल थांबविल्याबरोबर त्यांच्या डोकयावरुन, आजुबाजुला पक्षी घिरटया मारतांना दिसून येतात. त्यांनी आणलेले खाद्य पदार्थ व पिण्याचे पाणी विशिष्ट ठिकाणी टाकल्याबरोबर पक्षी जमिनीवर येवून ते खातात व पाणी पिऊन निघून जातात. अनेक वेळा पक्ष्यांची संख्या कमी असल्याचे राम यांना जाणवले की ते टाळी वाजवितात तेव्हा पक्ष्यांचा थवाचा थवा येवून आपले पोट भरुन जातात. याचप्रकार ते मोकाट जनावरांना पाण्याची व्यवस्था सुध्दा करीत आहेत. राम यांच्या कार्याचे परिसरात कौतूक केल्या जा
https://www.dailymotion.com/video/x8458t2
त आहे.