VIDEO : ‘एटीएम’कार्डव्दारे नागरिकांना शुद्ध व थंड पाणी
By Admin | Published: April 25, 2017 04:18 PM2017-04-25T16:18:45+5:302017-04-25T16:18:45+5:30
ऑनलाइन लोकमत शिरपूर (वाशिम), दि. 25 - उन्हाळ्यात जाणवत असलेली पाणी टंचाई व मिळत नसलेले शुद्ध पाणी ही बाब ...
ऑनलाइन लोकमत
शिरपूर (वाशिम), दि. 25 - उन्हाळ्यात जाणवत असलेली पाणी टंचाई व मिळत नसलेले शुद्ध पाणी ही बाब लक्षात घेवून शिरपूर ग्रामपंचायतच्यावतीने अभिनव उपक्रम राबविला आहे. नागरिकांना ‘एटीएम’ कार्डचे वाटप करुन त्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
शिरपूर ग्रामपंचायतने नागरिकांना शुद्ध व थंड पाणी मिळावे म्हणून एक प्रकल्प उभारला. ज्यात नागरिकांना याचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांना ना नफा ना तोटा तत्वावर १९० रुपयांमध्ये एक एटीएम कार्ड उपलब्ध करुन दिले. सदर कार्ड तेथे असलेल्या मशिनवर लावल्यानंतर १६ लिटर पाण्याची कॅन भरले जातात.
यासाठी तेथे कोण्याही व्यक्तीची गरज भासत नाही हे विशेष. जे नागरिक १९० रुपये भरु शकत नाहीत, त्या नागरिकांकरीता बाजूलाच एक क्वाईन बॉक्स ठेवण्यात आला असून त्यामध्ये ५ रुपये टाकल्यास त्यालाही १६ लिटर पाणी मिळत आहे.
ज्यांनी एटीएम कार्ड घेतले त्यांना १९० रुपये संपल्यानंतर १० रुपयांपासून रिचार्जची सुद्ध व्यवस्था ग्रामपंचायतच्यावतीने केली आहे. या उपक्रमाचे जिल्हयात कौतुक केले जात आहे. या उपक्रमामुळे मात्र पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे.
https://www.dailymotion.com/video/x844w4o