VIDEO : ग्रामीण भागात भुईमुगाच्या काढणीची लगबग
By Admin | Published: June 4, 2017 07:27 PM2017-06-04T19:27:25+5:302017-06-04T19:27:25+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 4 - जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरु झाल्याने मागील आठवडाभरापासून भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकाच्या ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 4 - जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरु झाल्याने मागील आठवडाभरापासून भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकाच्या काढणीची लगबग सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाळी ३भुईमुगाचे क्षेत्र दुप्पट झाले; परंतु या पिकाचे सरासरी उत्पादन घटल्याने शेतकरी आधीच निराश असताना त्यात मान्सूनपूर्व पावसाने धडाकाच सुरू केला. त्यामुळे हाती आलेल्या मूठभर पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकºयांनी भुईमुगाच्या काढणीची लगबग सुरू केली आहे. सदर पिकाची काढणी थेट झाडे उपटून करावी लागते, तसेच झाडे जमिनीवर आपटून शेंगा वेगळ्या कराव्या लागतात. त्यामुळे या प्र्रक्रि येला विलंब लागतो. अशात पावसाने हजेरी लावल्यास नुकसान होऊ शकते म्हणुन शेतकºयांनी मिळेल, तेवढे मजूर घेऊन या पिकाची काढणी वेगात सुरु केली आहे.
https://www.dailymotion.com/video/x84519y