VIDEO : वाशिममध्ये जीव धोक्यात घालून शेतकरी करतात सोयाबीनची वाळवणी

By admin | Published: October 20, 2016 03:43 PM2016-10-20T15:43:52+5:302016-10-20T16:12:34+5:30

ओले सोयाबीन सुकविण्यासाठी शेतक-यांकडे जागाच नसल्याने हे शेतकरी चक्क या महामार्गावर सोयाबीन पसरवून जीव धोक्यात घालत सोयाबीन वाळवतात.

VIDEO: Farmers by risking lives in Washim. Soybean Drying | VIDEO : वाशिममध्ये जीव धोक्यात घालून शेतकरी करतात सोयाबीनची वाळवणी

VIDEO : वाशिममध्ये जीव धोक्यात घालून शेतकरी करतात सोयाबीनची वाळवणी

Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २० - विविध नैसर्गिक अडचणीमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना पिके वाचविण्यासाठी मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. याची प्रचिती नागपूर-औरंगाबाद महामार्गावर बुधवारी पाहायला मिळाली. ओले सोयाबीन सुकविण्यासाठी शेतक-यांकडे जागाच नसल्याने हे शेतकरी चक्क या महामार्गावर सोयाबीन पसरवून जीव धोक्यात घालत सोयाबीन सुकवित आहेत. 
 
या महिन्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने थैमान घातले. शेतकºयांना त्यामुळे सोयाबीनची सोंगणी करणेही कठीण झाले. आता शेतकºयांनी सोयाबीन काढणीची धूम सुरू केली आहे; परंतु सततच्या पावसामुळे सोयाबीन हे अद्यापही ओलसर आहे. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षीत भाव मिळेणासे झाले आहेत. सोयाबीनला चांगले भाव मिळावेत म्हणून हे अर्धे ओले सोयाबीन सुकविण्यासाठी त्यांना मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत.  नागपूर-औरंगाबाद महामार्गावर काही शेतकरी जीव धोक्यात घालून सोयाबीन सुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात महामार्गावर सोयाबीन सुकविण्याचा प्रकार हा चुकीचाच आहे, महामार्गावर सतत वाहतूक सुरू असते. अशात रस्त्यावर पसरवून टाकलेल्या सोयाबीनमुळे महामार्गावर सतत सुरू असलेल्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. याच वाहतुक कोंडीमुळे एखादे वाहन घाईघाईने सोयाबीनवरून जाण्याचा प्र्रकार घडून येथे शेतकºयाचा जीवही धोक्यात येऊ शकतो, हेसुद्धा तेवढेच खरे; परंतु शेतकºयांकडे पुरेशी जागाच नसल्यामुळे हे शेतकरी नाईलाजास्तव मार्गावरच सोयाबीन पसरवून सुकवित आहेत. नागपूर-औरंगाबाद महामार्गावर कारंजा शेलुबाजारदरम्यान हा प्रकार पाहायला मिळत आहे.

Web Title: VIDEO: Farmers by risking lives in Washim. Soybean Drying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.