VIDEO : भाव घसरल्याने शेतक-यांनी कांदा फेकला
By Admin | Published: November 14, 2016 04:49 PM2016-11-14T16:49:04+5:302016-11-14T17:00:17+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. १४ कांदयांच्या लागवळीवेळी असलेले भाव चांगले असल्याने अनेक शेतक-यांनी कांदा पीक घेण्यास पसंती दिली. ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १४ कांदयांच्या लागवळीवेळी असलेले भाव चांगले असल्याने अनेक शेतक-यांनी कांदा पीक घेण्यास पसंती दिली. आजघडीला कांदयाचे भाव पडल्याने भाव वाढण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतक-यांनी कांदा साठवून ठेवला. भाव तर वाढला नाही पण शेतक-यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे.
मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील डिगांबर आप्पा देशमाने या शेतकºयाने आपल्या शेतात कांदा लागवड केली. कांदा निघाल्यानंतर चांगले भाव नसल्याने लागलेला खर्चही निघणार नसल्याने त्यांनी कांदा साठवून ठेवला. आजही ४ ते ५ रुपयेचं भाव असल्याने असलेला कांदा विक्री नेण्याचा खर्च व मिळणारी रक्कम परवडणारी नसल्याने त्यांच्यावर आज कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. तसेच सद्य स्थितीत ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याने कांदा खरेदीदारांकडे कांदा विकत घेवून पैसे देण्यासाठी नसल्याने सदर शेतक-यांचा कांदा जागेवरच सडला आहे. यामध्ये त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यांच्यासारखेच या परिसरात अनेक शेतकरी असून त्यांच्यावर भावच नसल्याने कांदा फेकण्याची वेळ आली आहे.
https://www.dailymotion.com/video/x844htd