VIDEO - जैन संस्थानच्यावतीने मजुरांची अशीही काळजी!
By Admin | Published: May 22, 2017 02:34 PM2017-05-22T14:34:08+5:302017-05-22T14:34:08+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 22 - धावपळीच्या युगात मनुष्य माणुसकी विसरत चालला असताना, कामावर असलेल्या मजुरांना उन्हाळयाच्या दिवसात काम ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 22 - धावपळीच्या युगात मनुष्य माणुसकी विसरत चालला असताना, कामावर असलेल्या मजुरांना उन्हाळयाच्या दिवसात काम करताना येत असलेला थकवा दूर करण्यासाठी दररोज मोफत ‘ताक’चे वितरण केले जात आहे. श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन तिर्थस्थान शिरपूर येथे सूरू असलेल्या मंदिर बांधकामासाठी ५०० मजुरवर्ग काम करीत आहे.
उन्हात तान्हात काम करतांना त्यांना सुध्दा थकवा जाणवत असल्याचे गुरुदेव पन्यास प्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या प्रेरणेतून सर्व महाजन परिवारांच्यावतिने दहयापासून तयार करण्यात आलेल्या ताकाचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचे मजुरवर्गात कौतूक केले जात आहे.
https://www.dailymotion.com/video/x844zbw