VIDEO : वाशिममधील पोलिस चौक्या झाल्या बुजगावणे
By Admin | Published: November 14, 2016 05:01 PM2016-11-14T17:01:03+5:302016-11-14T17:45:34+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. १४ - पोलिस स्टेशनच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस उपस्थित राहावे म्हणून विविध ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १४ - पोलिस स्टेशनच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस उपस्थित राहावे म्हणून विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या पोलिस चौक्या आता केवळ बुजगावणेच झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे सदर चौक्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेवरील पोलिसांची पकड सैल झाली असून, शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. कारंजा शहरातील बसस्थानकावरील पोलिस चौकी वगळता इतर चौक्या अपवादानेच उघडल्या जातात. त्याशिवाय कर्तव्य बजावत असलेले अधिकारी, कर्मचारी या चौक्यांकडे ढुंकुणही पाहत नसल्याचे दिसते. आहे. मंगरुळपीर शहरातील सुभाष चौक परिसरात असलेली पोलिस चौकी, तर असून अडचण नसून खोळंबा अशीच आहे. या चौकीच्या कुंपणाचे तीन तेरा वाजल्यामुळे गुरेढोरे रात्री आणि दिवसाही चौकीच्या आवारात मुक्तपणे विसावा घेत घाण करीत असतात. साधारण वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांनी ही चौकी सुरू केली होती; परंतु त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा या चौकीची गरज नसल्याप्रमाणे त्या ठिकाणी कधीच कोणी उपस्थित असल्याचे दिसत नाही. मंगरुळपीरच्या बसस्थानकावर तर पोलिस चौकीही नाही. बसस्थानकावर अद्याप पोलिस चौकी उभारण्यात आलेली नाही. शहर पोलिस स्टेशन प्रशासनाकडून येथे दररोज दोन पोलिसांची ड्युटी लावण्यात येत असते; परंतु सदर पोलिसांना बसण्यासाठी येथे चौकीच नसल्यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे
https://www.dailymotion.com/video/x844hvg