Video - सरकारविरुद्ध रोष, संतप्त शेतकऱ्यांकडून गाढवालाच दुग्धाभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:26 PM2018-07-19T15:26:40+5:302018-07-19T15:36:32+5:30
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी चक्क गाढवाच्या अंगावर दूध टाकून आपला रोष व्यक्त केला.
वाशिम - राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. राज्य शासन दूधाचे दर वाढवित नसल्याचे पाहून राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनही सुरू केले आहे. तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दुध फेकून निषेधही नोंदवला. बुधवारी संध्याकाळी चक्क गाढवाला दुग्धाभिषेक करत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.
येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत गाढवालाच दुधाने आंघोळ घालण्यात आली. शेतकरी कर्ज काढुन दुधाळ जनावरे घेतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यातही दुधाचे भाव कमी झाले असून दूधसंकलनही बंद केल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे असे मत संघटनेचे जिल्हा संघटक गजुअण्णा पैठनकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, यावेळी तालुकाध्यक्ष भिकनखाँ पठाण, सर्कल अध्यक्ष बालाजी पंजरकर, सचिन पर्हाड, राजुमहाराज गोसावी, राहुल जमधाडे, आश्रु पोपळघट, पंजाब अंभोरे तथा ईतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पाहा व्हिडिओ -