VIDEO - शिक्षणाधिका-यांच्या कक्षात भरली वडपची शाळा
By Admin | Published: July 4, 2017 02:51 PM2017-07-04T14:51:32+5:302017-07-04T14:54:02+5:30
ऑनलाइन लोकमत राजुरा, दि. 4- मालेगाव तालुक्यातील वडप येथील जिल्हा परिषद शाळेत १२० विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ तीनच शिक्षक असल्याने ...
ऑनलाइन लोकमत
राजुरा, दि. 4- मालेगाव तालुक्यातील वडप येथील जिल्हा परिषद शाळेत १२० विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात शाळा समितीसह ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिका-यांना निवेदन देवून शिक्षक भरण्याची मागणी केली होती. शिक्षक भरती न केल्यास आपल्या कक्षात शाळा भरविण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार ४ जुलै रोजी गटशिक्षणाधिका-यांच्या कक्षात वडपची शाळा भरविण्यासत आली.
मालेगाव पंचायत समिती अंतर्गंत येत असलेल्या वडप येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असून एकूण पटसंख्या १२० आहे. या शाळेत एक मुख्याध्यापक व तीन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याकरिता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालु तुळशिराम गायकवाड, उपसरपंच भगवान गोरख बोरकर, समाजसेवक सिताराम नामेदवराव कावळे, शाळा समिती सदस्य विनोद दत्तराव गायकवाड, गणेश नारायण जाधव, बालाजी सुभाष तटाले, गणेश देवबा बोरकर, रमेश पांडे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना २८ जून रोजी निवेदन देवून दोन शिक्षकांची नियुक्ती ७ दिवसाच्या आत करण्यात यावी अशी मागणी करुन नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा व शाळा पंचायत समितीमध्ये भरविण्याचा इशारा दिला होता.
सात दिवसाचा अवधी उलटून गेल्यानंतरही यावर कोणत्याच प्रकारची कारवाई न करण्यात आल्याने नागरिकांनी ४ जुलै रोजी गटशिक्षणधिका-यांच्या कक्षात शाळा भरविली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबधितांशी चर्चा व निवेदन देण्याकरीता त्यावेळी एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हते. शिक्षणाधिकारी सुटीवर तर विस्तार अधिकारी व ईतर अधिकारी मिटींगमध्ये असल्याचेसांगून भ्रमणध्वनी ठेवून दिला. त्यामुळे विद्यार्थी १० वाजतापासून कार्यालयातच बसून होते. याची वरीष्ठांनी दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
https://www.dailymotion.com/video/x84571u