VIDEO : एकाच बागेत 5 आंतर पीक घेणारा ‘शिवाजी’
By Admin | Published: January 27, 2017 04:24 PM2017-01-27T16:24:44+5:302017-01-27T16:35:09+5:30
ऑनलाईन लोकमत/ नंदकिशोर नारे वाशिम, दि. 27 - एका एकराच्या आंब्याच्या बागेत आंतरपिक म्हणून अॅपल बोर, कांदा, कडाय, रेशीम ...
ऑनलाईन लोकमत/ नंदकिशोर नारे
वाशिम, दि. 27 - एका एकराच्या आंब्याच्या बागेत आंतरपिक म्हणून अॅपल बोर, कांदा, कडाय, रेशीम उद्योग व रोपवाटीका असे पाच पीक घेणारा वाशिम तालुक्यातील टो येथील प्रयोगशिल शेतकरी ‘शिवाजी’ने नवीन प्रयोग यशस्वी केला आहे. एवढेच नाही तर त्याने या
आगळ्या वेगळ्या शेतीप्रयोगातून तब्बल 3,75,000 रुपये (पावणे चार लाख रुपये) उत्पन्न घेतले आहे. टो येथील शेतकरी शिवाजी बोरकर यांच्याकडे पाच एकर शेती आहे, पारंपरिक पद्धतीचे पीक परवडत नसल्याने केवळ इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या शिवाजीने अनुकरणातून गत सात वर्षापूर्वी एका एकर शेतीमध्ये केसर जातीच्या आंब्याची १०० झाडे लावलीत.
दरवर्षी सदर आंब्याची विक्री करुन ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न त्यांना होते. आंब्याची लागवड करतांना त्यांना २० बाय २० फूट अंतरावर केल्याने मधात चांगलाच स्पेसमध्ये अॅपल बोर लावली. यापासून त्यांना यावर्षी ६० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. बोराचे उत्पन्न झाल्यानंतर बोरांची झाडे काढून त्याठिकाणी कांद्यांची लागवड केली. त्यापसून जवळपास ५० हजार रुपयांच्यावर उत्पन्न अपेक्षित असल्याचे शिवाजी यांचे म्हणणे आहे.
याहीवर्षी आंब्याला चांगला मोहोर आल्याने लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच बागेच्या आजुबाजूला लावलेल्या तुतीपासून जे रेशीम तयार होणार आहे त्यापासून जवळपास दीड लाख रुपये उत्पन अपेक्षित आहे. याच आंब्याच्या बागेत विविध झाडांची रोपवाटीकेपासून किमान १० हजार रुपये याप्रमाणे एकूण पावणे चार लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
कृषिचा कोणताही डिप्लोमा अथवा शिक्षण झालेल्या नसलेल्या शिवाजीने अनुकरणातून कृषी क्षेत्रातील पिकांचे अंतर सुशिक्षितांनाही भुरड घालणारे आहे. अनेक कृषी क्षेत्रातील अधिका-यांनी येथे भेट देवून शिवाजींच्या कार्याचा गौरव केला आहे.
'प्रयोग केला त्याला यश आले'
एकच एक पीक घेवून वर्षभर शेत पडित ठेवल्यापेक्षा त्यामध्ये काही तरी नवीन प्रयोग करण्याचे मनी आले. व असे कोणते पीक आहे जे एकावेळी जास्तीत जास्त घेता येऊ शकते, याचा विचार केला व त्यापद्धतीने हे सर्व पीक घेतले. या पिकामुळे कोणत्याही पिकाचे नुकसान किंवा वाढीस अडचण होत नाही. प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्यात यश आले. आता काही शेतकरी येऊन माहिती विचारतात तेव्हा बरे वाटते - शिवाजी बोरकर, शेतकरी, टो.
https://www.dailymotion.com/video/x844q1p