VIDEO : हंगाम अर्ध्यावर असताना भुईमुगाची पेरणी

By Admin | Published: February 8, 2017 10:42 AM2017-02-08T10:42:56+5:302017-02-08T11:40:06+5:30

ऑनलाइन लोकमत शिरपूर जैन ( वाशिम). दि. ८ -  यंदा पावसाळा चांगला झाला. त्यामुळे शेतक-यांच्या विहिरीला ब-यापैकी पाणी असून, ...

VIDEO: Sowing of groundnut in the middle of the season | VIDEO : हंगाम अर्ध्यावर असताना भुईमुगाची पेरणी

VIDEO : हंगाम अर्ध्यावर असताना भुईमुगाची पेरणी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन ( वाशिम). दि. ८ -  यंदा पावसाळा चांगला झाला. त्यामुळे शेतक-यांच्या विहिरीला ब-यापैकी पाणी असून, रब्बी हंगामानंतर आता भुईमुगाच्या पे-यात वाढ होत आहे. भुईमुगाच्या पेरणीचा हंगाम अर्ध्यावर असतानाही सिंचनाची सोय असलेले अनेक शेतकरी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करताना दिसत आहेत.
 
वाशिम जिल्ह्यात मागील काही वर्षांत अवर्षणामुळे पाणीटंचाई झाली आणि शेतक-यांच्या सिंचनावर गदा आली. पाणीच नसल्यामुळे शेतकरी नुकसान नको म्हणून शेतक-यांनी उन्हाळी भुईमुगासारख्या पिकाची पेरणी करण्याचा विचारच केला नव्हता. परंतु यंदा मात्र जोरदार पावसामुळे सिंचनासाठी मुबलक पाणी असल्याने हंगाम अर्ध्यावर असतानाही शेतक-यांकडून चालू आठवड्यातही भुईमुगाची पेरणी करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक शेतक-यांनी गेल्या चार दिवसांत पेरणी केलेल्या भुईमुगाला तुषार सिंचनाचा आधार देण्यास सुरुवात केली आहे. 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844qog

Web Title: VIDEO: Sowing of groundnut in the middle of the season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.