VIDEO: जिवावर खेळून सापांना जीवदान देणारा सर्पमित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 03:19 PM2017-10-23T15:19:37+5:302017-10-23T15:19:47+5:30
साप दिसला की लोक घाबरून त्याला मारतात. प्रत्यक्षात साप हा घातक नसून माणसांसाठी फायद्याचा असल्यामुळे त्याला मारण्याऐवजी जीवदान देऊन त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे प्रयत्न करीत आहेत.
वाशिम - साप दिसला की लोक घाबरून त्याला मारतात. प्रत्यक्षात साप हा घातक नसून माणसांसाठी फायद्याचा असल्यामुळे त्याला मारण्याऐवजी जीवदान देऊन त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच त्यांनी आजवर दोन हजारांपेक्षा जास्त सापांना जिवावर खेळत पकडून जीवदान देण्याची कामगिरी केली आहे.
वन्यजीव आणि पर्यावरणासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचे चांगले परिणाम दिसत असले तरी, अद्यापही अनेकांना वन्यजीवांचे आणि पर्यावरणाचे महत्त्व कळलेले नाही. यासाठी गौरवकुमार इंगळे विविध माध्यमातून जनजागृती करतात. त्यांनी यासाठी विविध कार्यक्रमही घेतले असून, त्यामध्ये सर्पविषयक माहिती देणारा एक चांगला उपक्रम ते राबवितात. भारतात विषारी आणि बिन विषारी सापाच्या किती जाती आहेत. त्यांच्यापासून स्वत:चे रक्षण करतानाच त्यांचे रक्षण कसे करायचे. आदि बाबी ते प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देतात. त्यांनी आजवर दोन हजारांवर सापांना जीवदान दिले आहे. यामध्ये अतिशय घातक असलेल्या कोब्रा जातीच्या सापाचाही समावेश आहे. घोणस, फुरसे, मण्यार या विषारी सापांनाही त्यांनी जिवावर खेळून पकडत जीवदान दिले आहे. त्यांनी रविवारी मंगरुळपीर शहरालगतच एक कोब्रा पकडून त्याला जंगलात सोडले. हे करताना ते उपस्थित लोकांना मार्गदर्शन करतात.