VIDEO - स्वच्छता विभागाच्यावतीने ‘टमरेल’जप्ती अभियान

By Admin | Published: October 14, 2016 04:23 PM2016-10-14T16:23:36+5:302016-10-14T16:23:36+5:30

स्थानिक स्तरावर विविध कल्पनेतून बांधण्यात येणा-या शौचालयामुळे राज्यात शौचालय बांधणी अभियानाने गती घेतली आहे.

VIDEO - 'Tamralale' release campaign by the Department of Cleanliness | VIDEO - स्वच्छता विभागाच्यावतीने ‘टमरेल’जप्ती अभियान

VIDEO - स्वच्छता विभागाच्यावतीने ‘टमरेल’जप्ती अभियान

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

वाशिम, दि. १४ -   स्थानिक स्तरावर विविध कल्पनेतून बांधण्यात येणा-या शौचालयामुळे राज्यात शौचालय बांधणी अभियानाने गती घेतली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्यावतिने उघडयावर शौचास जाणा-या व्यक्तिंच्या घरातून ‘टमरेल ’ जप्ती करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
स्वच्छ महाराष्ट्र व्हावा याकरिता पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्यावतिने विविध कल्पनेमुळे या मोहीमेस गती निर्माण झाली आहे. स्वच्छता विभागाच्यावतीने टमरेल मुक्ती, लोटा मुक्ती अभियानास जिल्हयात सुरुवा त करण्यात आली आहे. जिल्हयात ४९१ ग्रामपंचायती आहेत यापैकी स्वयंस्फूर्तीने ७५ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत. 
जिल्हयातील ३० हजार कुटुंबियांना  भेटी देवून शौचालयाचे महत्व पटवून देण्याचे उदीष्ट वाशिम जिल्हयापरिषदेचे निश्चित होते. हे उदीष्ट पूर्ण करीत ३२ हजार ७८८ कुटुंबियांशी अधिकारी वर्गाने भेट दिली. या वर्षात  जिल्हयात ३५ हजार ८६५ शौचालय बांधकामाचे उदिष्ट असून त्याच्या पूर्णत्वतेसाठी पुढाकार घेतल्या जात आहे.

Web Title: VIDEO - 'Tamralale' release campaign by the Department of Cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.