VIDEO : ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याचा लोकवर्गणीतून कायापालट
By Admin | Published: April 26, 2017 06:09 PM2017-04-26T18:09:04+5:302017-04-26T18:09:04+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम , दि. 26 - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील इंग्रजकालीन पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण होवून अतिशय ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम , दि. 26 - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील इंग्रजकालीन पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण होवून अतिशय समस्या निर्माण झाल्या होत्या. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी कोण्या निधीची वाट न पाहता लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये जमा करुन या पोलीस ठाण्या चाकायापालट करण्यात आला. याकामी पोलीस ठाण्यामधील अधिकारी , कर्मचारी यांचा सहभाग तर आहेच शिवाय लोकांनीही यात हातभार लावला आहे.
शिरपूर जैन येथील पोलीस ठाण्याची ईमारत १८७२ साली बांधण्यात आलेली आहे. या ईमारतीची अतिशय दुरावस्था झाली होती. संपूर्ण इमारतीतील प्लॅस्टर पडून विटा दिसत होत्या, तसेच इलेक्ट्रिक वायर उघडया पडल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. यासह विविध समस्या उदभवल्या असतांना पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी इमारत दुरुस्तीचा प्रश्न मांडला असता सर्वांनी एकमताने मंजुर झाला व यामध्ये लोकांचाही सहभाग लाभल्याने या पोलीस ठाण्याचा कायापालट झाला आहे. येथे सर्व सुविधायुक्त व आकर्षक रंग दिल्याने जिल्हयातील सर्वात चांगले पोलीस ठाण्यांध्ये गणले जात आहे.
https://www.dailymotion.com/video/x844w7n