vidhan sabha 2019 : उमेदवार निश्चितीच्या वावड्या; अधिकृत घोषणेची प्रतिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 02:27 PM2019-09-27T14:27:06+5:302019-09-27T14:27:13+5:30

उमेदवारांची घोषणा झाली नसतानाही प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित असल्याच्या वावड्या जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत.

vidhan sabha 2019: Candidate Confirmation; Awaiting Official Announcement! | vidhan sabha 2019 : उमेदवार निश्चितीच्या वावड्या; अधिकृत घोषणेची प्रतिक्षा !

vidhan sabha 2019 : उमेदवार निश्चितीच्या वावड्या; अधिकृत घोषणेची प्रतिक्षा !

googlenewsNext


- दादाराव गायकवाड  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात युती, आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली नसतानाही प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित असल्याच्या वावड्या जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे. सोशल मिडियावर याबाबत चर्चा सुरू असली तरी, याबाबत पदाधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा झाली नसल्याचे सांगत अधिक वक्तव्य करण्यास नकार दिला. दरम्यान, जिल्ह्यातील युतीच्या जागा वाटपात तिसºया मित्रपक्षाचीही चर्चा जोरात सुरू आहे. तथापि, युतीच्या पदाधिकाऱ्यांचे घटस्थापनेच्या मुहूर्तावर होणाºया चर्चेकडेच लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचार संहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यात निवडणूक ज्वर चांगलाच वाढला आहे. ठिकठिकाणी निवडणुकीच्या चर्चा झडत आहेत. सोशल मिडियावरही यासंदर्भातील चर्चेला उधाण आले असून, कथित सूत्रांचा हवाला देऊन निवडणूक आणि उमेदवारांबाबत संदेश पाठविण्याचे सत्रच सुरू झाले आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित असल्याने या मित्रपक्षांनी नियोजनानुसार आपापल्या मतदारसंघातच तयारी केली असली तरी, वाशिम रिसोड मतदारसंघात काँग्रेसकडून, तर कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे, तर शिवसेना-युतीचा निर्णय झाला नसताना दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी तिन्ही मतदारसंघात तयारी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचीही हिच स्थिती आहे. त्यामुळे या तिन्ही आघाड्यांच्या इच्छुकांना उमेदवारी निश्चित होण्याची, मतदारसंघ निश्चित होण्याची प्रतीक्षा लागली आहे. त्यातच आता विविध पक्षाचे उमेदवार निश्चित झाल्याच्या वावड्या उठल्या आहेत.
यात प्रामुख्याने भाजपसाठी कारंजा आणि वाशिम मतदारसंघ सुटल्याची, तर रिसोड मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सुटल्याची चर्चा पसरविली जात आहे.
त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचाही कारंजा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी अमित झनकांचे नाव नसल्याची पोस्ट व्हॉटसअ‍ॅपवर फिरतांना दिसून येत आहे. सोशल मिडियावर पसरविण्यात आलेल्या उमेदवार निश्चितीच्या वावड्यांमुळे शिवसेनेच्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली असून, घटस्थापनेच्या दिवशी मुंबई येथे होणाºया चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या पदाधिकाºयांनी मात्र या वावड्यांना फेटाळेले आहे.

Web Title: vidhan sabha 2019: Candidate Confirmation; Awaiting Official Announcement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.