वाहतुक पोलीसांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 08:03 PM2017-09-21T20:03:16+5:302017-09-21T20:03:16+5:30

वाशिम :  भुसावळ येथील चोरट्यांच्या टोळीचा वाशिम शहरात धुमाकुळ सुरू असल्याचे लक्षात येताच वाहतुक पोलीसांनी या टोळीतील दोन चोरट्यांना सिनेस्टाईल पकडून शहर पोलीसांच्या स्वाधीन केले. या चोरट्यांनी चोरलेले रोख सहा हजार रूपये त्यांच्या खिशामध्ये आढळून आले. ही घटना वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात २१ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता घडली. 

Vigilance of traffic police alerted stolen | वाहतुक पोलीसांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद

वाहतुक पोलीसांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : एक पसार 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  भुसावळ येथील चोरट्यांच्या टोळीचा वाशिम शहरात धुमाकुळ सुरू असल्याचे लक्षात येताच वाहतुक पोलीसांनी या टोळीतील दोन चोरट्यांना सिनेस्टाईल पकडून शहर पोलीसांच्या स्वाधीन केले. या चोरट्यांनी चोरलेले रोख सहा हजार रूपये त्यांच्या खिशामध्ये आढळून आले. ही घटना वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात २१ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता घडली. 
गोरेगाव (ता. सेनगाव जि. हिंगोली) येथील काही युवक वाशिम शहरात देवीची मुर्ती खरेदी करण्यासाठी आले होते. या युवकापैकी सुदर्शन प्रभाकर पवार हा शिवाजी चौक परिसरात असलेल्या जावळे मुर्तीकाराजवळ आपल्या खिशातील पैसे मोजत असताना अचानक एक युवक गर्दीमध्ये घुसला. या भामट्याने मोठ्या हातचलाखीने पवार याचे हातामधील रोख सहा हजार रूपये जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. त्याचा पाठलाग केला परंतू तो आढळून आला नाही. त्यानंतर ही टोळी पाटणी चौकामध्ये आली. पाटणी चौकामध्ये बाजार घेत असताना नारायण ग्यानुजी घुले (रा. झाकलवाडी ता.जि. वाशिम) यांचे खिशामधील १६०० रूपये एका चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेले. घुले यांनी आरडाओरड केली असता पाटणी चौकामध्ये कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्योती विल्लेकर यांनी प्रसंगावधान राखून आपल्या कर्मचाºयांना चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याच्या सुचना दिल्या. वाहतुक पोलीस सचिन जाधव, राहुल वानखेडे, स्विटी कोटरवार, चालक मनोहर राठोड, होमगार्ड संदिप पोहनकर यांनी संशयीत चोरट्याला पकडण्यासाठी अक्षरश: सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग केला. 
वाहतुक पोलीसांच्या सतर्कतेमुळे मुकेश सुंदºया पवार (वय २५) व संजय सचिव गुजर (वय १९) या दोघांना जेरबंद करण्यात यश आले. या टोळीतील अन्य चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही चोरट्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे रोख सहा हजार रूपये आढळून आले. या दोघांविरूध्द वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्याला पकडणाºया वाहतुक पोलीसांचे नागरिकांमध्ये कौतुक केल्या जात आहे. 

हिंगोली नाक्यावरील सायकल दुकान फोडले
वाशिम :  कृषी उत्पन्न बाजार समिती संकुलामध्ये असलेल्या गुणवंता आत्माराम भोयर यांच्या सायकल दुकानचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानामधील दोन सायकली, सायकलचे कुलूप व गल्यातील चिल्लर असा अंदाजे एकुण पाच हजाराचा ऐवज लंपास केला. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये माहिती देण्यात आली. घटनास्थळावर सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

क्षुल्लक कारणावरून चाकुहल्ला 
वाशिम : शहरातील पाटणी चौक परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून सुनिल नंदकिशोर रिंढे (रा. काळे फैल, वाशिम) याचेवर शैलेश वस्ताद (रा. जांभरून नावजी , वाशिम) याने कांदा कापण्याचे चाकुने पायावर वार केला. यामध्ये रिंढे याला गंभीर दुखापत झाली. ही घटना २१ सप्टेंबरला सकाळी ९ वाजताचे सुमारास घडली. या घटनेची रिेंढे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली असुन पोलीसांनी शैलेश वस्ताद याचेविरूध्द भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Vigilance of traffic police alerted stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.