वाशिम जिल्ह्यात गावोगावी स्वच्छता रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:46 PM2018-09-25T15:46:53+5:302018-09-25T15:47:11+5:30

अभियानाच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हयात गावोगावी स्वच्छता रॅली काढली जात आहे.

Village cleanliness rally in Washim district! | वाशिम जिल्ह्यात गावोगावी स्वच्छता रॅली !

वाशिम जिल्ह्यात गावोगावी स्वच्छता रॅली !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने  जिल्ह्यात‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हयात गावोगावी स्वच्छता रॅली काढली जात आहे.
 २५ सप्टेंबर रोजी इंझोरी, काटा, जऊळका, किन्हीराजा यासह ४५ गावांत स्वच्छता रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी धारण केलेल्या पारंपरिक वेशभुषा आणि कलापथकाने सर्वांचे लक्ष वेधले 
स्वच्छतेसंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, गाव हगणदरीमुक्त करणे, शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसर स्वच्छ ठेवणे याबरोबरच स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे  ‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान व्यापक पद्धतीने राबविले जात आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना, स्चच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्यासह गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ सहभाग घेत आहेत. इंझोरी येथील रॅलीत अंगणवाडी सेविकांनी पारंपरिक नऊवारी पातळे परिधान करून सहभाग घेतला, तर लेझीम पथकाने कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

Web Title: Village cleanliness rally in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.