कन्टेनमेंट झोनवर ग्राम समितीचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:20+5:302021-05-05T05:07:20+5:30

०००० कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडली ! रिसोड : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाला शासनाकडून चालू आर्थिक वर्षात निधी मिळाला नाही. ...

Village committee's attention on containment zone | कन्टेनमेंट झोनवर ग्राम समितीचे लक्ष

कन्टेनमेंट झोनवर ग्राम समितीचे लक्ष

Next

००००

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडली !

रिसोड : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाला शासनाकडून चालू आर्थिक वर्षात निधी मिळाला नाही. परिणामी, वाशिम तालुक्यातील लघू प्रकल्प, कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे रखडली आहेत.

००००

बेलखेड येथील हातपंप नादुरुस्त

वाशिम : बेलखेड फाटा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. या फाट्यावर हातपंपाची सुविधा आहे; मात्र हातपंप नादुरुस्त असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

0000000000000000000

चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी

वाशिम : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी तहसीलदारांनी जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट सुरू केले आहेत. यातील यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मेडशी चेकपोस्टवर पोलिसांनी सोमवारी वाहनांची तपासणी केली.

000000000000000000

चिखली येथे आणखी दोन कोरोना रुग्ण

वाशिम : रिसोड तालुक्यातील चिखली येथे आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाने नागरिकांची सोमवारी तपासणी केली.

००००

नियम उल्लंघनप्रकरणी वाहनांवर कारवाई

वाशिम : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत मंगळवारी मालेगाव तालुक्यात ४७ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. ही मोहीम पुढेही चालु राहणार आहे.

00000000000000000000

शेलुबाजार येथील गर्दीवर नियंत्रण

वाशिम : काही दिवसांपूर्वी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करून शेलुबाजार गावात ठिकठिकाणी गर्दी होत होती. याप्रकणी पोलीस प्रशासनाने कारवाईचे सत्र अवलंबिल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळाल्याचे दिसत आहे.

00000000000000000

तोंडगाव परिसरात आरोग्य तपासणी

वाशिम: अलिकडच्या काळात तोंडगावसह परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. तोंडगाव परिसरात आरोग्य तपासणी मोहीम राबविली असून, नागरिकांची तपासणी केली.

000000000000000

महामार्गावर वाहनांची कसून तपासणी

वाशिम : मालेगाव-वाशिम महामार्गावर अमानी महामार्ग पोलीस केंद्राच्या पथकाकडून सोमवारी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. नियम तोडणाऱ्यांवर यादरम्यान दंडात्मक कारवाई करण्यात आली.

00000000000000000000

पशुचिकित्सालय इमारतींची दुरवस्था

वाशिम : पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हाभरातील ८ ठिकाणच्या पशुचिकित्सालय इमारतींची अवस्था वाईट आहे. त्यामुळे पशुपालकांसह कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे.

Web Title: Village committee's attention on containment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.