ग्रामलेखा समन्वयकांची ६९ रिक्त पदे ‘बाद’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 02:56 PM2018-10-26T14:56:11+5:302018-10-26T14:56:26+5:30
जिल्हा व तालुकास्तरावर ग्रामलेखा समन्वयकांची १७३ पदे मंजूर होते. रिक्त राहिलेली ६९ पदे आता बाद केली असून, पश्चिम वºहाडातील सहा पदांचा यामध्ये समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या दोन्ही योजनाांची यशस्वीरित्या हाताळणी करणे आणि दोन्ही यंत्रणांच्या कामांमध्ये समन्वय राहण्याकरीता राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा व तालुकास्तरावर ग्रामलेखा समन्वयकांची १७३ पदे मंजूर होते. रिक्त राहिलेली ६९ पदे आता बाद केली असून, पश्चिम वºहाडातील सहा पदांचा यामध्ये समावेश आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम या दोन्ही केंद्र पुरस्कृत योजनांमधील बाबी यशस्वीरित्या हाताळणे सोयीचे जावे याकरीता या दोन्ही यंत्रणांच्या कामांमध्ये सुसुत्रीपणा आणणे, त्यांच्या समन्वय राहण्यासाठी या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीकरीता वाशिमसह राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा व तालुकास्तरावर आवश्यक ते मनुष्यबळ व पदांची निर्मिती केली होती. ३४ ग्रामीण जिल्ह्यांमधील १७३ उपविभागांमध्ये ग्रामलेखा समन्वयकांच्या १७३ पदांना मंजूरीही दिलेली होती. यापैकी या ना त्या कारणाने ६९ पदे रिक्त होती. या रिक्त पदांमध्ये पश्चिम वºहाडातील वाशिम जिल्ह्यातील दोन, बुलडाणा जिल्ह्यातील १ आणि अकोला जिल्ह्यात दोन पदांचा समावेश होता. आता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २६ आॅक्टोबर रोजी रिक्त पदे बाद ठरविल्याने ती पदे भरता येणार नाहीत. रिक्त पदे ‘निरसित’ (बाद) केली असून, ती पदे भरण्यात येऊ नये, अशा सूचनाही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरी यंत्रणेला दिल्या आहेत. सुधारीत मंजूर पदेसंख्येनुसार आता वाशिम जिल्ह्यात तीन, बुलडाणा जिल्ह्यात चार आणि अकोला जिल्ह्यात तीन ग्रामलेखा समन्वयक कायम राहिले आहेत.
वाशिम जिल्ह्यात ग्रामलेखा समन्वयकांची पाच पदे मंजूर होती. यापैकी तीन पदे भरण्यात आली आहेत. रिक्त असलेली दोन पदे निरसित केल्याने आता ती भरता येणार नाहीत.
- सुदाम इस्कापे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद वाशिम