वाशिम जिल्ह्यातील या गावात कोरोनाला मिळाला नाही थारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 07:12 PM2021-07-04T19:12:53+5:302021-07-04T19:13:20+5:30

Washim District village has no Corona patients : नियमांचे पालन करीत आरोग्याची योग्य काळजी घेतल्यानेच या गावात अद्यापही कोरोना संसर्गाला थारा मिळू शकला नाही

The village of Kherda kept Corona out of the gate for a year | वाशिम जिल्ह्यातील या गावात कोरोनाला मिळाला नाही थारा

वाशिम जिल्ह्यातील या गावात कोरोनाला मिळाला नाही थारा

googlenewsNext

वाशिम : शेलुबाजार  कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आणि लाखो लोकांचा बळी घेतला. तथापि, अशी अनेक गावे आहेत. ज्यांनी अद्याप कोरोनाला गावात प्रवेशच करू दिला नाही. त्यात मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील खेर्डा खु. या गावाचा समावेश आहे. गावकºयांनी नियमांचे पालन करीत आरोग्याची योग्य काळजी घेतल्यानेच या गावात अद्यापही कोरोना संसर्गाला थारा मिळू शकला नाही.

मंगरुळपीर तालुक्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेने शेलुबाजार परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली होती. त्यात एक, दोघांचा बळी गेला, तर दुसºया लाटेत परिसरात कोरोना संसर्गाने थैमानच घातले. परिसरातील ३० ते ३५ गावांपैकी अनेक गावांत कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला; परंतु शेलूबाजार आरोग्य वर्धिनी केंद्राच्या हिरंगी आरोग्य उपकेंद्रातील खेर्डा. खु. या गावात कोरोना प्रवेशच करू शकला नाही. कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसºया लाटेतही गावातील एकाही व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला नाही.
 

त्रीसुत्री आणि काटेकोर नियमांचे पालन
कोरोना संसर्गामुळे वाशिम जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला असतानाही जिल्ह्यात या विषाणूच्या घातकतेबाबत फारसे गंभीर नाहीत. त्यामुळेच दुसºया लाटेने जिल्ह्यात थैमान घातले होते. आरोग्य विभाग आणि प्रशासनाने तोंडाला मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा नियमित वापर, या त्रीसुत्रीचा अवलंब व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनही करण्याबाबत लोक उदासीन होते. तथापि, खेर्डा खु. गावात ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, तसेच आरोग्य कर्मचाºयांच्या मार्गदर्शनात गावकºयांनी त्रीसुत्रीचा अवलंब करतानाच नियमांचे काटेकोर पालन केल्यानेच या गावात कोरोना संसर्गाचा प्रवेश होऊ शकला नाही, असे येथील आरोग्य सेवक नप्ते यांनी सांगितले.

Web Title: The village of Kherda kept Corona out of the gate for a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.