कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामस्तरीय समिती कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:19 AM2021-03-04T05:19:28+5:302021-03-04T05:19:28+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य यांचा समावेश असून, पोलीसपाटील हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
................
बॉक्स :
समितीला घ्यावी लागणार विशेष खबरदारी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी समितीला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार, अत्यावश्यक कामाशिवाय गावातून कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन करणे. गृहविलगीकरणातील रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तींची नावे तहसील कार्यालयास सादर करणे. विशेषत: लग्नसमारंभ व इतर गर्दीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवणे. आस्थापनांमध्ये गर्दी न होता दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर ठेवून, मास्क, सॅनिटायझरचा वापर होत असल्याबाबत खात्री करणे. सेवांच्या सर्व ठिकाणांवर हात धुण्याची व्यवस्था करणे. कोरोना संसर्गाची लक्षणे असणारी व्यक्ती आढळून आल्यास तातडीने तालुका प्रशासनाशी समितीने संपर्क साधावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.