घाटा गावची वाट झाली बिकट; शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 03:42 PM2019-07-07T15:42:06+5:302019-07-07T15:42:15+5:30
वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रगतीशिल शेतकऱ्यांचे तथा वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली असून शेतात पिकणारा माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेताना शेतकऱ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. असे असताना रस्त्याच्या तद्वतच अन्य स्वरूपातील विकासाच्या मागणीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.
कृषी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणाºया मालेगाव तालुक्यातील निवडक गावांमध्ये घाटा या गावाचा अग्रक्रम लागतो. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये या गावातील शेतकºयांकडून विक्रमी उत्पन्न घेतले जात आहे. सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी बहुतांश शेतकºयांनी शेततळे घेतल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतमालाच्या सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे; मात्र शेतात पिकणारा माल बाजारपेठेत पोहचविण्याकरिता घाटा या गावाला पांगरखेडामार्गे शिरपूर अशा रस्त्याची उपलब्धी अद्यापपर्यंत मिळाली नाही. यामुळे विविध स्वरूपातील अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घाटा ते पांगरखेडा फाट्यापर्यंत पक्की सडक उभारण्याची मागणी सरपंच फलांगा रमेश चव्हाण यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी केली. घाटा या गावापासून पांगरखेडा फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर अनेक प्रयोगशिल शेतकºयांची शेती वसलेली आहे. तसेच पांगरखेडा फाट्यापासून काही अंतरावर नागपूर ते औरंगाबाद हा महामार्ग आहे. या फाट्यापासून शिरपूरमध्ये जाण्याकरिता केवळ चार किलोमिटरचे अंतर पार करावे लागते; मात्र हा रस्ता लालफितशाहीत अडकून असल्याने सद्या घाटा ते किन्ही घोडमोड आणि तेथून शिरपूर असे मोठे अंतर पार करावे लागत आहे. यामुळे विशेषत: शेतकºयांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.